कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 31 मे 2022 रोजी शिमला येथे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद


पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21,000 कोटी रुपयांचा 11वा हप्ताही जारी करणार

केंद्रीय कृषिमंत्री तोमर पुसा (दिल्ली) येथील शेतकऱ्यांसोबत या देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होतील

Posted On: 29 MAY 2022 7:28PM by PIB Mumbai

 

वर्षभर चालणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, विविध केंद्रीय मंत्रालयांचा एक भव्य संयुक्त कार्यक्रम 31 मे रोजी आयोजित केला जाणार आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे "गरीब कल्याण संमेलन" या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात, 9 केंद्रीय मंत्रालये/विभागांद्वारे चालवल्या जाणार्‍या 16 योजना/कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.यावेळी ते 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 20,000 कोटी रुपये रक्कम जारी करतील. विविध राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) येथेही कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर पुसा (दिल्ली) येथे शेतकऱ्यांबरोबर सहभागी होतील.

हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल, ज्या अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये देशव्यापी चर्चा होईल , ज्यात पंतप्रधान मोदी लाभार्थ्यांशी त्यांच्या जीवनावर केंद्रीय योजनांच्या परिणामांबद्दल संवाद साधतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र-एक शिधापत्रिका , प्रधानमंत्री कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत ,पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनाच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

दोन टप्प्यातील कार्यक्रमांतर्गत, राज्य/जिल्हा/केव्हीके स्तरावरील कार्यक्रम सकाळी 9.45 वाजता सुरू होईल. सकाळी 11.00 वाजता, तो राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाशी जोडला जाईल. दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. MyGov द्वारे राष्ट्रीय कार्यक्रम वेबकास्ट होणार आहे , याासाठी  लोकांना स्वतःची नोंदणी करता येईल. यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया चॅनेल द्वारे देखील हा कार्यक्रम पाहता येईल.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829258) Visitor Counter : 234