माहिती आणि प्रसारण मंत्रालय

17 व्या मिफ्फ़ मध्ये उद्बोधक मास्टर क्लासेसची मांदियाळी


रसूल पुक्कुटी, प्रसून जोशी, सुभय्यानल्ला मुथु आणि कार्टर पिल्चर सारखे दिग्गज चित्रपट रसिकांशी साधणार संवाद

Posted On: 28 MAY 2022 6:33PM by PIB Mumbai

 

सुप्रसिद्ध ध्वनी संयोजक, रसूल पुक्कुटी, शब्दांचे लीलया जाळे विणणारे, प्रसून जोशीसुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते, सुभय्या नल्ला मुथु आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले, लघुपट निर्माते, कार्टर पिल्चर असे नामवंत दिग्गज, 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या मास्टर क्लासेस मध्ये प्रतिनिधींना उद्बोधन करणार आहेत.

चित्रपट महोत्सवाचा अविभाज्य घटक असलेले हे मास्टर क्लासेस, यंदाही या महोत्सवात मोठे आकर्षण ठरणार आहे.

महोत्सवात येणारे विद्यार्थी आणि प्रतिनिधींना सिनेमा निर्मितीच्या कलेची शास्त्रशुद्ध माहिती व्हावी, यासाठी, महोत्सवाचे आयोजक नेहमीच अत्यंत मेहनत घेऊन मास्टर क्लासेस चे आयोजन करत असतात.

चित्रपट पुनरुज्जीवित करण्यासाठी, कला आणि मूल्यांचा अंतर्भाव,’ ‘कथा सांगण्याची कला’, ‘ सिनेमातील ध्वनीचे सौंदर्यआणि अॅनिमेटिंग इन इंडिया फॉर ड वर्ल्डअशा विषयांवरील मास्टर क्लासेस उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी, एक उत्तम शिक्षण देणारा अनुभव ठरणार आहे.

त्याशिवाय, कोविड नंतरचे सिनेमाविश्व, सिनेमा निर्मिती आणि सिनेमा प्रदर्शित करण्यात ओटीटी मुळे झालेला बदल, आणि वन्यजीव चित्रपट निर्मिती यावर देखील चर्चासत्रे होणार आहेत.

17 व्या मिफ्फची संपूर्ण सज्जता झाली असून, नवोदित उत्साही चित्रपटनिर्माते, प्रेक्षक, समीक्षक आणि चित्रपट रसिकांचे संपूर्ण सात दिवस, म्हणजेच 29  मे ते 4 जून 2022 या काळात स्वागत करण्यास महोत्सवाचेआयोजक उत्सुक आहेत.

17 व्या मिफ्फ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या मास्टर क्लासेसची यादी:

चित्रपट पुनरुज्जीवनाची कला आणि मूल्येशिवेंद्र सिंह डुंगरपूर- 30 MAY 2022 | 11.30 AM – 1 PM

तुमचा चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरण्यास काय करायला हवं?’ -कार्टर पिल्चर 30 MAY 2022 | 2 PM – 3.30 PM

अॅनिमेटिंग इन इंडिया फॉर ड वर्ल्ड’.’ (अॅनिमेशन ) कृष्ण मोहन चिंतापट्टा आणि तीर्थदीप घोष  30 MAY 2022 | 3.45 PM – 5.45 PM

माय क्रिएटिव्ह प्रोसेस.’ (अॅनिमेशन) -रेगिना पेसोआ 31 MAY 2022 | 2 PM – 3.30 PM

: पडद्यापासून ते ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत सिनेमाचा झालेला विस्तार- कोविडोत्तर काळातील सिनेमा.’ -रिझवान अहमद 1 JUNE 2022 | 11.30 AM – 1 PM

वन्यजीव चित्रपट निर्मिती: एक करियर: वन्यजीव चित्रपट निर्मिती करियर नव्हे, तर ती वचनबद्धता.’ – सुभय्या नल्ला मुथु  2 JUNE 2022 | 3.45 PM – 5.45 PM

सिनेमातील ध्वनीचे सौंदर्य’ – रसूल पुक्कुटी 3 JUNE 2022 | 3.45 PM – 5.45 PM

कथा सांगण्याची कला’ -प्रसून जोशी- 9 तारीख आणि वेळ लवकरच निश्चित होईल)

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

***

PIB MIFF Team | G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor/MIFF-6

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828996) Visitor Counter : 174


Read this release in: Urdu , English , Hindi , Bengali