माहिती आणि प्रसारण मंत्रालय
या वर्षी प्रथमच लहान मुले असणार मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग
ॲनीमेशन चित्रपट ‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ आणि ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल” मुलांसाठी दाखवले जाणार
Posted On:
28 MAY 2022 4:06PM by PIB Mumbai
मुंबई. मे, 28, 2022
महोत्सवातील सिनेमांचा अव्याहत आनंद साजरा करत असताना आपण आपल्या लहानग्या सर्जनशील मित्रांना कसे काय दूर ठेऊ शकतो! हो, या वर्षी पहिल्यांदाच 18 वर्षांखालील मुले 17व्या मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहेत. माहितीपट आणि ॲनीमेशनपट यांना समर्पित असलेला हा चित्रपट महोत्सव दक्षिण आशियातल्या सर्वात जुन्या आणि मोठ्या महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात मुलांना दोन मास्टर क्लास ॲनिमेशन चित्रपट ‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ आणि ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ बघण्याची सुवर्णसंधी, मुंबईत 27 मे ते 4 जून, 2022 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या 17व्या महोत्सवात मिळणर आहे.
या दोन्ही ॲनिमेशन चित्रपटांना सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. मित्रांनो जर तुम्ही लहान आहात आणि MIFF प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली नसेल तरीही तुम्ही हे शो बघु शकाल. लहान मुलांना फिल्म्स डिविजन इथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देण्याची आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ 31 मे 2022 रोजी दुपारी 3.45 वाजता जी बी प्रेक्षागृह, फिल्म्स डिविजन कॉम्प्लेक्स इथे दाखवला जाईल. त्याच प्रमाणे ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ हा चित्रपट 30 मे 2022 रोजी दुपारी 3.45 वाजता ऑडी – II, फिल्म्स डिविजन येथे दाखविला जाईल.
अॅनिमेशन पटांविषयी माहिती:
भारत आणि जपान यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या 'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाचे मिफ्फ मधे विशेष सादरीकरण होणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होऊन यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत. वाल्मिकी रामायणावर आधारित, 'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' मध्ये, अॅनिमेशनची फ्यूजन म्हणजे मिश्रित शैली वापरण्यात आली असून, त्यात, जपानचे अॅनिमेशन-मॅग्ना, अमेरिकेतील डिस्ने आणि रवीवर्माची चित्र शैली अशा तिन्ही कलांचा संगम करण्यात आला आहे. भारतातील विख्यात अॅनिमेशन पट दिग्दर्शक राम मोहन आणि जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक युगो साको आणि कोईची सास्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नेटफ्लिक्सची मूळ मालिका "मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल" च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. झी इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स (झिका) चे माजी विद्यार्थी, कृष्णा मोहन चिंतापाटला, यांना अॅनिमेशन पट निर्मितीचा 25 वर्षांचा अनुभव आहे. अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या या अनुभवी दिग्दर्शकाने ह्या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.
***
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
PIB MIFF Team | G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor/MIFF-4
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828970)
Visitor Counter : 269