माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ मध्ये तुम्ही कशासाठी जाणार? आम्हाला सांगा, आमच्या ट्वीटर हँडल- Twitter @PIB_India/ @PIBMumbai वर..

Posted On: 28 MAY 2022 3:21PM by PIB Mumbai

 

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघायला कोण कोण जाईल?आणि का जाईल? ? असा प्रश्न तुम्हाला कोणी मित्रांनी, तुमच्या सहकऱ्यांनी, किंवा कोणी नाही तर तुम्हीच स्वतःला विचारला का?

आणि जेव्हा तुमच्यासाठी मनोरंजनाचे इतर हजारो पर्याय एक क्लिकवर उपलब्ध असतांना, मिफ्फ बघायला कोणी का जावं?

माहितीपट तर फार बोरिंग असतात, आणि अॅनिमेशन्स तर फक्त लहान मुलांसाठी असतात ना !

असं मुळीच नाही!

आपली केवळ पाच मिनिटं द्या, आणि एक नजर मारा, 17 व्या मिफ्फ मध्ये तुमच्यासाठी काय काय आहे त्याकडे. तुम्हाला तुमच्या वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील?

मिफ्फमध्ये तुम्हाला वाटतंय तसं पारंपरिक काहीही नाही. चित्रपट रसिक आणि कलाप्रेमी, ज्यांना त्यांच्या मनाला सुखावणाऱ्या , आत्म्याला साद घालणाऱ्या कथा बघायच्या असतील तर त्याचं उत्तर आहेमिफ्फ ! जर तुम्हाला खरोखरच उत्तम सिनेमा आवडत असतील, तर त्याबद्दल इतरांनाही सांगा आणि तुम्ही देखील उत्तमोत्तम सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी मिफ्फ मध्ये जरूर या !

17 वा मिफ्फ, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरुपात आहे, आणि तो पूर्णपणे मोफत आहे.

यावर्षीच्या मिफ्फ मध्ये तुम्हाला, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरुपात 400 चित्रपट बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही,तुमच्या घरी आरामात बसून चित्रपट बघू शकाल, किंवा दक्षिण मुंबईत पेडर रोडवरच्या फिल्म डिव्हिजनच्या सुंदर परिसरात येऊनही सिनेमांचा आनंद घेऊ शकता, हाही एक नवा अनुभव असेल. कारण इथेही सिनेमा प्रदर्शन पूर्ण मोफत आहे. फिल्म्स डिव्हिजन च्या परिसरात संपूर्ण महोत्सव बघण्यासाठी, तुम्हाला केवळ 300 रुपये नाममात्र शुल्क भरुन नोंदणी करायची आहे, https://miff.in/  या संकेतस्थळावर जाऊन.. आणि मग या महोत्सवाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता..

ऑनलाईन मोड वर तुम्ही हे सिनेमे पूर्णपणे मोफत बघू शकता..

विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे :

https://miff.in/delegate2022/?cat=c3R1ZGVudF9kZWxlZ2F0ZQ==

माध्यमांसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक:

https://miff.in/delegate2022/?cat=bWVkaWE=

सर्वसामान्यांना नोंदणी करण्यासाठी लिंक :

https://miff.in/delegate2022/?cat=ZGVsZWdhdGU=

 

इथे तुमची मनोरंजनाची उपासमार तर होणार नाहीच, शिवाय, पोटापाण्याचीही सोय केलेली आहे. इथे, तुमच्यासाठी उत्तम चित्रपटांसोबत, उत्तम खाद्यपदार्थही असतील- तुंगा, शालिमार, आमची मुंबई, मेधाज किचन, चेतन फूड अशा स्टॉल्सवरचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि उन्हाळ्याची काहिली शांत करणारे थंडगार कोक !

म्हणजे, मनही तृप्त होणार आणि पोटही !

त्याशिवाय, चित्रपट रसिकांना, इथे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती-जसे की नल्लामुथु, ऑस्कर पुरस्कार विजेते नामवंत साऊंड डिझायनर रसूल पुक्कूटी, लेखक आणि गीतकार प्रसून जोशी आणि इतर अनेक मान्यवर या महोत्सवात उपस्थित असतील.

मिफ्फ च्या बेवसाईटवर जाऊन, ‘स्क्रीनिंग मध्ये, तुम्हाला चित्रपटांची संपूर्ण यादी मिळू शकेल.

मग, कोण कोण येणार आहे @ #MIFF2022 मध्ये ?

महोत्सवाचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्ही आमचे आभार नक्की मानाल !

***

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

***

PIB MIFF Team |  G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor/MIFF-3

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1828962) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali