संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1971 युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे प्रतीक, अधोमुख रायफल आणि हेल्मेट, सैन्य दलाने इंडिया गेट इथून राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलवले

Posted On: 27 MAY 2022 5:51PM by PIB Mumbai

 

सैन्य दलाने, आज आयोजित करण्यात आलेल्या समारंभात  इंडिया गेट इथे असलेली अधोमुख रायफल आणि हेल्मेट हे 1971 युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे प्रतीक, राष्ट्रीय युद्ध स्मारकातील परमयोद्धा स्थळ इथे हलविले आणि परमवीर चक्र विजेत्यांच्या पुतळ्यांच्या केंद्रस्थानी बसवले गेले.

या समारंभासोबतच, 1971 युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्मारकाचे राष्ट्रीय युद्ध  स्मारकात विलीनीकरण पूर्ण झाले.

या समारंभाचे नेतृत्व एकीकृत संरक्षण दलाचे एकात्मिक संरक्षण सेवांचे प्रमुख (सीआयएससी), एअर मार्शल बी आर कृष्णा यांनी केले.तिन्ही सेवांचे महा सैन्य सहाय्यक समकक्ष यावेळी उपस्थित होते.

या समारंभाचा एक भाग म्हणून इंडिया गेट इथे अखेरची मानवंदना देण्यात आली तसेच सीआयएससी यांनी इंडिया गेट येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अधोमुख रायफल आणि हेल्मेट काढण्यात आले आणि सजविलेल्या वाहनातून परम योद्धा स्थळ इथे नेऊन नव्याने तयार करण्यात आलेल्या स्मारकात बसविण्यात आले. सीआयएससी आणि तिन्ही संरक्षण दलाच्या महा सैन्य सहाय्यक समकक्षानी नव्या स्मारकाला मानवंदना दिली.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828790) Visitor Counter : 198