PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
26 MAY 2022 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 26 मे 2022
- 192.82 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- India's Active caseload currently stands at 15,414
- Active cases stand at 0.04%
- Recovery Rate currently at 98.75%
- 2,167 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,26,04,881
- 2,628 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (0.58%)
- Weekly Positivity Rate (0.51%)
- 84.84 cr Total Tests conducted so far; 4,52,580 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 192.82 कोटींहून अधिक (1,92,82,03,555) मात्रांचा टप्पा पार केला. 2,43,56,591 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 3.33 कोटींहून अधिक (3,33,02,653) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 15,414 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.75% इतका आहे. गेल्या 24 तासांत 2,167 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,04,881. इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,628 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 4,52,580 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.84 कोटी (84,84,11,356) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.51% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58%. नोंदविण्यात आला आहे.
इतर अपडेट्स :
S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828559)
Visitor Counter : 139