युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
लक्ष्य सेनचा दुबईत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसेन यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्याचा प्रस्ताव आणि सिंधूने तिच्यासोबत परदेशात जाण्यासाठी केलेली फिटनेस ट्रेनरची विनंती लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजने (टॉप्स) अंतर्गत मंजूर
Posted On:
26 MAY 2022 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2022
दुबईत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनसोबत प्रशिक्षण घेण्याच्या, भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या प्रस्तावाला मिशन ऑलिम्पिक सेल (MOC) समितीच्या सदस्यांनी गुरुवारी मान्यता दिली.
या महिन्यात प्रतिष्ठित थॉमस चषक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाचा भाग असलेला लक्ष्य 29 मे ते 5 जून (8 दिवस) या कालावधीत दुबईमध्ये एक्सेलसनसोबत सराव करणार आहे आणि त्यानंतर मलेशियन प्रशिक्षण केंद्रात 19 ते 26 जून (8 दिवस) या कालावधीत प्रशिक्षणासाठी 19 जून रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथे रवाना होणार आहे. राष्ट्रकुल खेळांच्या तयारीसाठी दोन्ही प्रशिक्षण प्रस्तावांना मिशन ऑलिम्पिक सेलने मान्यता दिली आहे.
मंजूर केलेल्या रकमेमध्ये त्याच्या आणि त्याच्या फिजिओच्या विमान प्रवासाचा खर्च, जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्चांसह दिवसभराचा भत्ता समाविष्ट केला जाईल.
लक्ष्यच्या प्रस्तावाबरोबरच, मिशन ऑलिम्पिक सेल समितीने बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही सिंधूचे फिटनेस ट्रेनर एम श्रीकांत मदापल्लीला तिच्यासोबत आगामी अनेक स्पर्धांसाठी जाण्यासाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला.
श्रीकांत इंडोनेशिया मास्टर्स (7-12 जून), इंडोनेशिया ओपन (14-19 जून), मलेशिया मास्टर्स (28 जून ते 3 जुलै), आणि मलेशिया ओपन (5-10 जुलै), आणि सिंगापूर ओपन (12-17 जुलै) या स्पर्धांसाठी सिंधू सोबत जाणार आहे.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828557)
Visitor Counter : 188