संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल - बांगलादेश नौदल यांचा बोंगोसागर हा संयुक्त युद्धाभ्यास सुरू
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2022 3:36PM by PIB Mumbai
भारतीय नौदल (आयएन) आणि बांगलादेश नौदल (बीएन) यांच्यात संयुक्त (द्विपक्षीय) बोंगोसागर युद्धाभ्यासाला 24 मे 22 रोजी बांगलादेशातील मोंग्ला बंदरात सुरुवात झाली. हा तिसरा युद्धाभ्यास आहे. बंदरांमधल्या सरावाचा टप्पा 24-25 मे दरम्यान होत आहे आणि त्यानंतरच्या टप्प्यात 26-27 मे पर्यंत बंगाल उपसागराच्या उत्तर भागात सराव केला जाईल.
KGF2.jpeg)
दोन्ही नौदलांमधील सागरी युद्धसराव आणि मोहिमांच्या व्यापक सहकार्यातून उच्च प्रमाणात परस्पर समन्वय आणि संयुक्त परिचालन कौशल्ये विकसित करणे हा बोंगोसागर युद्धसरावाचा उद्देश आहे.
भारतीय नौदलाचे जहाज कोरा, स्वदेशी बनावटीचे गाईडेड क्षेपणास्त्र कॉर्व्हेट आणि सुमेधा, स्वदेशी बनावटीची गस्ती नौका या सरावात सहभागी होत आहेत. बीएनएस अबू उबैदाह आणि अली हैदर हे दोन्ही गाइडेड क्षेपणास्त्र फ्रिगेट्स बांगलादेश नौदलाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
UF3Q.jpeg)
सरावाच्या बंदर टप्प्यात व्यावसायिक आणि सामाजिक संवाद आणि मैत्रीपूर्ण क्रीडास्पर्धा समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, समुद्रात सराव आयोजित करण्यावर रणनीतिक पातळीवर नियोजन चर्चा केली जाईल. सरावाचा सागरी टप्पा दोन्ही नौदलाच्या जहाजांना सागरी पृष्ठभागावरील युद्ध कवायती, तोफगोळ्यांचा सराव, नाविक विकास आणि युद्धजन्य परिस्थितीत समन्वित हवाई कारवाईत सहभागी होण्यास मदत करेल.
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1828221)
आगंतुक पटल : 352