केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री परशोत्तम रुपाला यांनी ब्राझीलच्या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आमंत्रणावरून 16 ते 20 मे 2022 या दरम्यान ब्राझीलला भेट दिली. पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन
क्षेत्रातले तज्ज्ञ तसेच खासगी क्षेत्राच्या प्रतिनिधी मंडळाच्या शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले.
रुपाला यांनी ब्राझील येथील त्यांचे समकक्ष मार्कोस मोन्तेस कॉर्देरो यांच्यासह ब्राझिलचे कृषी, पशुधन आणि पुरवठा मंत्र्यांबरोबर फलदायी चर्चा केली. परस्पर हिताचे संबंध दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांमध्ये यावेळी
सहमती झाली.
रुपाला यांनी ब्राझिलचे आपले समकक्ष मोन्तेस कॉर्देरो, कृषी, पशुधन आणि पुरवठा मंत्री यांच्याशी फलदायी चर्चा केली. परस्पर हितसंबंध दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांमध्ये सहमती झाली.
केंद्रीय मंत्री रुपाला यांनी ब्राझील असोसिएशन ऑफ झेबू ब्रीडर्स (ABCZ), उबेराबाचे महापौर, ब्रझिलिअन कृषी आणि पशुधन संघटना (CNA), आणि ब्राझील सहकारी संघटना (OCB) यांच्याबरोबरच्या बैठकीत
संशोधन आणि विकास,जेनेटिक सुधारणा, व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून दुग्धोत्पादन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठीच्या विविध उपायांवर चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष महामहीम बोल्सोनारो यांच्या जानेवारी 2020 मधील भेटीत इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये 15 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. तसेच पशुधन, दुग्धोत्पादन, तेल आणि नैसर्गिक वायु,
जैव-उर्जा, इथेनॉल,व्यापार आणि गुंतवणूक यासह अन्य क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली होती.
ब्राझिलिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या समारंभात रुपाला सहभागी झाले आणि ब्राझीलमधील अनेक योग प्रशिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी,
भारतीय दुतावासाने ब्राझील येथीलआयुर्वेद तज्ज्ञ डॉ. जोस रोग्यू यांच्या सहकार्याने अनुवादित केलेल्या “प्रोफेसर आयुष्मान” या आयुर्वेदिक पुस्तिकेचे त्यांनी प्रकाशन केले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या
मान्यवरांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा एक भाग म्हणून, भारतीय अवकाश संस्था, इस्रोने केलेल्या प्रगतीची माहिती देण्यासाठी भारतीय दुतावासाने 21 मे ते 10 जून 2022 या काळात ब्राझील येथील तारांगणामध्ये अवकाश
प्रदर्शन आयोजितकेले आहे. रुपाला यांनी 20 मे 2022 रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
***
***
S.Thakur/R Agashe/DY