श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक - एप्रिल 2022

Posted On: 21 MAY 2022 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

एप्रिल 2022 साठी कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत -: 1986-87=100) प्रत्येकी 10 अंकांनी वाढून अनुक्रमे 1108 (एक हजार एकशे आठ) आणि 1119 (एक हजार एकशे एकोणवीस) पर्यंत पोहोचला आहे. शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या सर्वसामान्य निर्देशांकात अनुक्रमे 7.32 आणि 7.13 पर्यंत झालेली वाढ मुख्यत्वे खाद्यान्नाच्या गटामुळे झाली आहे. तांदूळ, कणीक (गव्हाचे पीठ), ज्वारी, बाजरी, नाचणी भाज्या, फळे इत्यादींच्या किंमती वाढल्यामुळे ही वाढ दिसून येत आहे.

निर्देशांकातील वाढ/ घट राज्या-राज्यांत वेगवेगळी आहे. शेतमजुरांबाबत, निर्देशांकात 19 राज्यांमध्ये 1 ते 20 अंकांची वाढ नोंदली गेली तर तमिळनाडूमध्ये 7 अंकांची घट झालेली दिसून आली. 1275 अंकांसह   तामिळनाडू निर्देशांकाच्या सारणीत सर्वोच्च स्थानावर आहे तर 880 अंकांसह हिमाचल प्रदेश सर्वात खालच्या स्थानावर आहे.

ग्रामीण मजुरांच्या बाबतीत निर्देशांकात 19 राज्यांमध्ये 2 ते 19 अंकांची वाढ दिसून आली आहे, तर तामिळनाडूमध्ये 7 अंकांची घट झाली आहे. 1263 अंकांसह तमिळनाडू निर्देशांकाच्या सारणीत सर्वोच्च स्थानावर आहे तर 931 अंकांसह हिमाचल प्रदेश तळाशी आहे.

राज्यांमध्ये शेतमजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकातील (CPI-AL) सर्वाधिक वाढ केरळात (20 अंक) अनुभवाला आली तर ग्रामीण मजुरांच्या बाबतीत (CPI-RL) केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना (19 अंक) हा अनुभव आला. मुख्यत्वे तांदूळ, डाळी, ताजी/ सुकी मासळी, भाज्या व फळे, कणीक, बाजरी, सरपण, सुती कापड (गिरणीचे), प्लॅस्टिकची पादत्राणे इत्यादी महाग झाल्याने ही वाढ दिसून आली. तर याउलट, तामिळनाडूमध्ये शेतमजूर आणि ग्रामीण मजूर दोन्हींसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (सात-सात अंकांची) घट दिसून येण्यामागे मुख्यत्वे तांदूळ, ताजी/ सुकी मासळी, कांदे आणि भाज्या व फळे यांमधील स्वस्ताई हे कारण होते.

महागाईवाढीच्या दराचा गेल्या महिन्याच्या तुलनेत विचार करता, एप्रिल 2022 मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक  कृषी मजूर आणि अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक  ग्रामीण  मजूर CPI-RL अनुक्रमे 6.44% व 6.67% इतके आहेत, तर मार्च 2022 मध्ये ते अनुक्रमे 6.09% व 6.33% इतके होते. गेल्यावर्षी याच महिन्यात ते अनुक्रमे 2.66% आणि 2.94% इतके होते. त्याचप्रमाणे, खाद्यान्नाबाबतची महागाई एप्रिल 2022 मध्ये  अनुक्रमे 5.29% व 5.35% इतकी होती, मार्च 2022 मध्ये तिचे दर अनुक्रमे 4.91% व 4.88% इतके होते तर गेल्यावर्षीच्या याच महिन्यात ते दर अनुक्रमे 1.24% आणि 1.54% इतके होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001QN8H.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002Y73X.jpg  

 

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसाधारण आणि गटनिहाय)-:

Group

Agricultural Labourers

Rural  Labourers

 

March, 2022

April, 2022

March, 2022

April, 2022

General Index

1098

1108

1109

1119

Food

1025

1035

1032

1043

Pan, Supari,  etc.

1914

1917

1924

1926

Fuel & Light

1222

1233

1216

1226

Clothing, Bedding  &Footwear

1147

1162

1179

1195

Miscellaneous

1168

1177

1172

1181

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00308OX.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004Y7RN.jpg


* * *

Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827182) Visitor Counter : 263