भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ओएफबी टेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एसएमडब्लू इस्पात प्रायव्हेट लिमिटेड मधील प्रमुख भागभांडवल संपादन करण्यास दिली मान्यता
प्रविष्टि तिथि:
19 MAY 2022 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ओएफबी टेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एसएमडब्लू इस्पात प्रायव्हेट लिमिटेड मधील प्रमुख भागभांडवल संपादन करण्यास मान्यता दिली आहे.
प्रस्तावित संयोजनात ओएफबी टेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (ओएफबी टेक) एसएमडब्लू इस्पात प्रायव्हेट लिमिटेड (एसएमडब्लू इस्पात) मधील बहुसंख्य भागभांडवल संपादन करण्याची संकल्पना आहे.
ओएफबी टेक, एक खाजगी मर्यादित कंपनी आहे. ती ऑनलाइन आणि थेट व्यवसाय साखळीच्या माध्यमातून पोलाद, नॉन-फेरस धातू, औद्योगिक रसायने आणि पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह्ज, कृषी- उत्पादने यांसारख्या उत्पादनांसाठीच्या कच्च्या मालाच्या घाऊक व्यापाराच्या व्यवसायात सक्रीय आहे.
एसएमडब्लू इस्पात ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टीएमटी पोलाद बार आणि स्टील बिलेट्स सारख्या उत्पादनांच्या व्यवसायात सक्रीय आहे.
सीसीआयचा तपशीलवार आदेश नंतर येईल.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1826665)
आगंतुक पटल : 204