संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांचे भारतीय नौदलाच्या पी8आय (P8I) विमानातून उड्डाण

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान, भारतीय नौदलाच्या 'पी8आय' या लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी  पाणबुडीविरोधी लढाऊ विमानातून उड्डाण केले.

या उड्डाणादरम्यान संरक्षण मंत्र्यांना, अत्याधुनिक मिशन सूट आणि सेन्सर्सचा वापर करून लांब पल्ल्यापर्यंत  टेहळणी , इलेक्ट्रॉनिक युद्ध, प्रतिमा  बुद्धिमत्ता , पाणबुडीविरोधी लढाऊ मोहिमा तसेच  शोध आणि बचाव क्षमतांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

पी8आय  विमानाचा समावेश 2013 पासून नौदलात करण्यात आल्यानंतर, हिंद महासागर क्षेत्रात (आयओआर ) भारतीय नौदलाच्या सातत्यपूर्ण टेहळणी मोहिमांमध्ये लक्षणीय वाढ झाली  आहे.

या लढाऊ विमानाच्या कर्मचारी वर्गात  दोन वैमानिक आणि तीन महिला अधिकाऱ्यांसह सात नौदल हवाई संचालन अधिकाऱ्यांचा समावेश होता.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1826474) आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी