ऊर्जा मंत्रालय
मिश्रण करण्यासाठी कोळसा वेळेत आयात करण्याच्या अनुषंगाने, ऊर्जा मंत्रालयाचे स्वतंत्र वीज उत्पादकांसह (आयआयपी ) सर्व वीज निर्मिती कंपन्यांना निर्देश
Posted On:
18 MAY 2022 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2022
जर 31.05.2022 पर्यंत मिश्रणासाठी कोळशाच्या आयातीची मागणी वीज निर्मिती कंपन्यांनी नोंदवली नाही आणि मिश्रित उद्देशासाठी आयात केलेला कोळसा 15.06.2022 पर्यंत वीज प्रकल्पांमध्ये येण्यास सुरुवात झाली नाही तर,31.10.2022 पर्यंतच्या उर्वरित कालावधीत वेळेत कार्यवाही न करणाऱ्या सर्व वीज निर्मिती कंपन्यांना मिश्रित उद्देशासाठी 15% (पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे एप्रिल-जून 2022 मध्ये मिश्रित उद्देशासाठी आयात कोळशाची कमतरता भरून काढण्यासाठी) कोळसा आयात करावा लागेल, असे निर्देश उर्जा मंत्रालयाने सर्व वीज निर्मिती कंपन्यांना जारी केले आहेत. एप्रिल आणि मे 2022 मध्ये फारसे मिश्रण झालेले नाही, ते वीज प्रकल्प (ज्यांनी अद्याप आयात केलेल्या कोळशाचे मिश्रण सुरू केले नाही) ऑक्टोबर 2022 पर्यंत 15% दराने आणि त्यानंतर नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत 10% दराने कोळसा मिश्रीत केला जाईल, हे सुनिश्चित करतील, असे या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेच्या तुलनेत देशांतर्गत स्त्रोतांकडून कोळशाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, 01.06.2022 पासून संभाव्य उपलब्धतेच्या आधारावर सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना देशांतर्गत कोळशाचे त्या प्रमाणात वितरण केले जाईल आणि मिश्रित उद्देशासाठी आयात केलेल्या कोळशातून तसेच बंदिस्त कोळसा खाणींमध्ये उत्पादनासाठी निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार,उर्वरित आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे , असे मंत्रालयाने राज्य सचिवांना/प्रधान सचिवांना आणि सर्व वीज निर्मिती कंपन्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.. जर 15.06.2022 पर्यंत देशांतर्गत कोळशाचे मिश्रण सुरू केले नाही तर वेळेत कार्यवाही न करणाऱ्या संबंधित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी देशांतर्गत कोळशाचे वितरण आणखी 5% ने कमी केले जाईल.त्यानुसार, वरील पद्धतीच्या आधारे जुलै, 2022 पासून देशांतर्गत कोळशाचे सुधारित वितरण निर्धारित प्रमाणात केले जाईल. ऑक्टोबर, 2022 पर्यंत सुरळीत कार्यान्वयन चालावे यासाठी सर्व वीजनिर्मिती कंपन्यांनी त्यांच्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असल्याचे सुनिश्चित करावे असे ऊर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826368)
Visitor Counter : 209