रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय खतमंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांच्या नेतृत्वाखाली खते आणि रसायन मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची जॉर्डनला भेट


देशातील आगामी पीक हंगामासाठी चालू वर्षाकरिता 30 एलएमटी रॉक फॉस्फेट, 2.50 एलएमटी डीएपी, 1 एलएमटी फॉस्फोरिक आम्लाचा पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

भारत जॉर्डन संयुक्त समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन खतांच्या पुरवठ्यात तसेच नव्या गुंतवणुकीसाठी लक्ष घालणार : डॉ. मनसुख मंडाविया

Posted On: 17 MAY 2022 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2022

 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे गरीब आणि शेतकऱ्यांचे हित पाहणारे सरकार आहे आणि शेतकऱ्यांना आश्वासित केल्याप्रमाणे खतांचा पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे.'' असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच खते आणि रसायन मंत्री  डॉ. मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे.  देशात खतांचा तुटवडा नाही , असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसुख मंडाविया यांनी आज जारी केलेल्या निवेदनात हा निर्वाळा दिला.

या प्रकारच्या पहिल्याच उपक्रमांतर्गत , डॉ. मनसुख मंडाविया यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने 13 मे ते 15 मे 2022  दरम्यान जॉर्डनला भेट दिली. अल्पकालावधीसाठी तसेच दीर्घकाळासाठी  खते आणि कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करणे,हा या दौऱ्याचा उद्देश  होता. सध्याच्या खतांच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा  दौरा करण्यात आला. याबाबतीत डॉ. मंडाविया म्हणाले की, भारताला फॉस्फोरिक आणि पॉटॅशच्या पुढील पुरवठ्याच्या संदर्भात हा दौरा  ठरला. जॉर्डन फॉस्फेट मायनिंग कंपनी (जेपीएमसी) सोबत  30 एलएमटी रॉक फाँस्फेट, 2.50 एलएमटी डीएपी, 1 एलएमटी फॉस्फोरिक आम्ल यांचा पुरवठा भारतीय सार्वजनिक, सहकारी संस्था आणि खासगी कंपन्यांना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले.  पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक 2.75 एलएमटी  पुरवठा करण्यासंदर्भात जॉर्डनसोबत दीर्घकालीन  सामंजस्य करार करण्यात आला असून हा पुरवठा दरवर्षी एकसमान प्रमाणात 3.25 एलएमटीपर्यंत  वाढेल, असेही त्यांनी  म्हटले आहे.   खतांच्या क्षेत्रात जॉर्डन हा भारताचा पसंतीचा भागीदार असल्याचे डॉ. मनसुख मंडाविया यांनी बैठकांमध्ये  नमूद  केले. डॉ. मनसुख मंडाविया यांनी खतांच्या क्षेत्रात  आजच्या कसोटीच्या काळात हे संबंध मजबूत करण्याच्या आवश्यकतेवर ठळकपणे प्रकाश टाकला.

केंद्रीय रसायन आणि खत मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाने जेआयएफसीओ आणि इंडो-जॉर्डन कंपनीने उभारलेल्या जेपीएमसी खाणी  आणि फॉस्फोरिक आम्ल उत्पादन केंद्रांना भेट दिली. शिष्टमंडळाने अरब पोटॅश मुख्यालयालाही भेट दिली जेथे केंद्रीय  मंत्र्यांचे अध्यक्ष आणि सीईओंनी अतिशय अगत्याने स्वागत केले. अरब पोटॅशच्या प्रयत्नांची प्रशंसा करतानाच, डॉ. मंडाविया यांनी एमओपीचा भारताला वाजवी दरात पुरवठा करण्याच्या गरजेवर जोर दिला.

भारतीय कंपन्यांनी जॉर्डनमध्ये अधिक गुंतवणूक करण्याबाबत जॉर्डन उत्सुक असल्याचे यावेळी आवर्जून नमूद करण्यात आले. इफ्क्कोसोबत सध्या असलेला संयुक्त उपक्रम आणि जेपीएमसी (जॉर्डन फॉस्फेटिक माइन्स कंपनी) मधील आयएफएफसीओ आणि आयपीएल यासारख्या  भागीदारांबाबतच्या अनुभवाची प्रशंसा करताना ,भारतीय भागीदार कंपन्या या धोरणात्मक भागीदार असून त्यांनी जॉर्डनला शक्य ती सर्व प्रकारची तांत्रिक, आर्थिक आणि मार्केटिंगची मदत करून क्षमता उभारणीला चालना दिली असल्याचे नमूद करण्यात आले.

व्यापार आघाडीवर विशिष्ट प्रोत्साहनासाठी, जॉर्डनने भारत हा फॉस्फेटिक आणि पोटॅश या खतांचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याबाबत स्तुती करतानाच त्याला प्राधान्यक्रम दिला जाईल, असे सांगितले. या पैलूवर दोन्ही बाजूंनी काम करण्यास आणि  संयुक्त समितीच्या माध्यमातून कालबद्ध स्पष्ट आराखडा तयार करण्यास मान्यता दिली. दीर्घकाळासाठी  आणि अल्पकालीन खतांच्या पुरवठ्याबाबत तसेच नव्या गुंतवणुकीबाबत लक्ष घालण्यासाठी संयुक्त समिती नेमण्यासही उभय देशांनी मान्यता दिली आहे.

 

 

 

 

S.Kulkarni/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826097) Visitor Counter : 154