संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वायएआय मल्टीक्लास अजिंक्यपद नौकानयन स्पर्धा 2022 (आयएन -एमडीएल चषक)

Posted On: 16 MAY 2022 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2022

 

भारतीय नौदलाच्या नौकानयन आणि विंडसर्फिंग संघातल्या सहभागींनी नुकत्याच झालेल्या वायएआय  मल्टीक्लास नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 2022 (आयएन -एमडीएल चषक) मध्ये दोन सुवर्ण (Nacra 17 आणि  470 mix classes), एक रजत (470 mix class)  आणि दोन कांस्य (49er and iQFoil classes). पदके  जिंकून लक्षवेधक कामगिरी केली.

भारतीय नौकानयन संघटना (YAI)आणि भारतीय नौदल नौकानयन  संघटना (INSA) यांच्या  सहयोगाने बोटींच्या वरिष्ठ ऑलिम्पिक वर्गांसाठी हा कार्यक्रम 8 ते 15 मे  2022 या काळात इंडियन वॉटरमनशिप ट्रेनिंग सेंटर (INWTC), मुंबई येथे  आयोजित करण्यात आला होता.

मेसर्स माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.  वायएआय  मानांकन  आणि आशियाई खेळांसाठीची ही निवड चाचणीही  होती.

या शर्यती मुंबई बंदराजवळच्या समुद्रात घेण्यात आल्या. देशभरातील 10 सेलिंग क्लब मधील एकूण 97 नाविकांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धकांनी  राष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी पाच दिवसांच्या काळात ताशी 8 ते  15 किलोमीटर वेगाचे वारे आणि खवळलेल्या समुद्रात 5 पदकांसाठीच्या शर्यतींसह एकूण  121 शर्यतींमध्ये अटीतटीची झुंज दिली. ILCA 7, ILCA 6, 49er, 470 (mixed) आणि RS:X या पाच श्रेणींसाठी  पदकांची शर्यत आयोजित करण्याची भारतीय नौदलाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ होती. मालिकेच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्पर्धेची पातळी कायम राखण्यासाठी जगभरातल्या महत्त्वाच्या  नौकानयन स्पर्धांमध्ये  दुहेरी गुणांसह पदकांच्या शर्यतीची संकल्पना वापरली जाते. 

स्पर्धकांना त्यांच्या खेळासाठी चांगल्या दर्जाचे आणि न्याय्य व्यासपीठ मिळावे यासाठी  जागतिक नौकानयनामध्ये पात्र असलेले आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकारी, आंतरराष्ट्रीय परीक्षक आणि आंतरराष्ट्रीय मापक यांच्यासह कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या संघाने निर्दोषपणे काम केले.

15 मे 2022 रोजी INWTC (मुंबई) येथे आयोजित समारोप समारंभाला वाईस एडमिरल के. स्वामिनाथन, AVSM, PVSM, चीफ ऑफ स्टाफ, पश्चिम नौदल कमांड मुख्यालय, हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्पर्धेच्या विजेत्यांना पदके प्रदान केली.

 

  S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1825858) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi