उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त अरब अमिरातीच्या दिवंगत राष्ट्राध्यक्षांच्या दुःखद निधनाबद्दल राष्ट्राच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्रपतींचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आगमन

Posted On: 15 MAY 2022 7:59PM by PIB Mumbai

 

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुःखद निधनाबद्दल देशाच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू हे आज अबुधाबी इथे पोहोचले.

अबु धाबी येथील मुश्रीफ पॅलेस येथे संयुक्त अरब अमिरातीचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि राजघराण्यातील इतर सदस्य आणि अमिराती मान्यवरांची भेट घेऊन नायडू यांनी दिवंगत राष्ट्राध्यक्षांच्या योगदानाचे स्मरण केले आणि ते म्हणाले की शेख खलिफा हे महान जागतिक नेते आणि भारताचे सच्चे मित्र होते."

दिवंगत राष्ट्राध्यक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, शेख झायेद यांचा वारसा समृद्ध करत आणि भारत-संयुक्त अरब अमिराती मधील भागीदारी मोठ्या प्रमाणावर मजबूत करून संयुक्त अरब अमिरातीच्या विकासासाठी शेख खलिफा यांनी दूरदर्शी नेतृत्व कसे दाखवले त्याचे स्मरण नायडू यांनी केले. संयुक्त अरब अमिरातीमधील मोठ्या भारतीय प्रवासी समुदायाच्या त्यांनी घेतलेल्या अनन्यसाधारण काळजीचा उल्लेख करून नायडू म्हणाले कि त्यांचे दुःखद निधन हे संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.

बैठकीत, उपराष्ट्रपतींनी महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराची आणि त्यांच्या भारत भेटीची आठवण करून, नायडू यांनी महामहिम शेख मोहम्मद यांच्या गतिशील दृष्टीकोन आणि नेतृत्वाची प्रशंसा केली. नवीन राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली भारत-संयुक्त अरब अमिराती धोरणात्मक भागीदारीत प्रगती होत राहील आणि नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

span>


(Release ID: 1825644) Visitor Counter : 167