उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 MAY 2022 5:08PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण संदेश पुढील प्रमाणे -
“मी 'बुद्धपौर्णिमेच्या' पवित्र प्रसंगी देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देत आहे.
विश्वातील महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक अशा भगवान बुद्धांनी गहन सत्याचा उपदेश दिला. त्यांच्या शिकवणीचे लक्ष्य आपल्या दु:खाच्या मूळ कारणाचा शोध घेणे आणि लोकांना दु:खापासून मुक्त करणे होते.
नि:संशय, भगवान बुद्ध आणि त्यांचा 'धम्म' प्रकाशाचा शाश्वत स्रोत आहे, तो नैतिकता, समाधान आणि आनंदाच्या मार्गावर आपल्याला मार्गदर्शन करतो.
या, आपण या शुभ प्रसंगी भगवान बुद्धांनी दाखवलेल्या वैश्विक प्रेम, करुणा आणि समानतेच्या तत्वांचे पालन करण्याप्रती आपली वचनबद्धता व्यक्त करुया.”
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1825551)
आगंतुक पटल : 202