आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 191.15 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.15  कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 18,096

गेल्या 24 तासात 2,858 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.66%

Posted On: 14 MAY 2022 2:02PM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.15 (1,91,15 ,90,370) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,38,96,925 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.15 (3,15,28,673) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,091

2nd Dose

1,00,28,814

Precaution Dose

50,07,651

FLWs

1st Dose

1,84,17,515

2nd Dose

1,75,63,748

Precaution Dose

81,33,543

Age Group 12-14 years

1st Dose

3,15,28,673

2nd Dose

1,17,55,668

Age Group 15-18 years

1st Dose

5,89,27,016

2nd Dose

4,38,39,174

Age Group 18-44 years

1st Dose

55,65,38,161

2nd Dose

48,42,32,281

Precaution Dose

3,67,871

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,29,584

2nd Dose

18,95,10,390

Precaution Dose

9,44,349

Over 60 years

1st Dose

12,70,06,271

2nd Dose

11,81,18,199

Precaution Dose

1,61,35,371

Precaution Dose

3,05,88,785

Total

1,91,15,90,370

 

सध्या भारतातील रुग्णसंख्या 18,096 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028MXJ.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,355 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,76,815  झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003UO89.jpg

गेल्या 24 तासात 2,858 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004L8VJ.jpg

गेल्या 24 तासात एकूण 4,86,963 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.34 (84,34,31,758) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.66% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.59 % आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005IKC2.jpg

***

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1825328) Visitor Counter : 187