माहिती आणि प्रसारण मंत्रालय

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार मिश्र स्वरुपात: महोत्सव संचालकांची माहिती


महोत्सवासाठी आजच नोंदणी करा; 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी मोफत नोंदणी; माध्यम प्रतिनिधींसाठी आजपासून नोंदणी खुली

मिफ्फ 2022 मध्ये, “माइटी लिटिल भीम: आय लव्ह ताजमहल’ एपिसोडचा वर्ल्ड प्रीमियर

सत्याजित रे यांच्या ‘सुकुमार रे’ या एनएफएआयने पुनरुज्जीवित केलेल्या माहितीपटाचे इंडियन प्रीमियर होणार

17 व्या मिफ्फ साठी 30 देशांतून 808 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त

यंदाच्या मिफ्फमध्ये इंडिया@75 या संकल्पनेवर आधारित विशेष पुरस्कार

भारत-जापान यांची सहनिर्मिती असलेल्या पहिल्याच ॲनिमेशन पटाचे विशेष प्रदर्शन

Posted On: 13 MAY 2022 7:24PM by PIB Mumbai

मुंबई, 13 May 2022

जगभरातील चित्रपटांचे ‘बहुरूपदर्शन’ देणारा, माहितीपट, लघुपट, अ‍ॅनिमेशनपटांचा 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -मिफ्फ लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिफ्फ 2022 ची सुरुवात येत्या 29 मे पासून होणार असून, उद्घाटनाचा कार्यक्रम, वरळीच्या नेहरु विज्ञान केंद्राच्या सभागृहात होणार आहे. तर महोत्सवाची सांगता चार जून 2022 रोजी होणार आहे. 17 व्या मिफ्फ साठी येणाऱ्या प्रतिनिधीना या महोत्सवात अत्यंत दर्जेदार आणि विविध विषयांवरील आशयप्रधान चित्रपट, बघण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि इतर माहितीसाठी, www.miff.in या संकेतस्थळाला भेट द्या.

या महोत्सवासाठी, माध्यम प्रतिनिधींची नोंदणी आजपासून सुरु होत आहे. मी आपल्या सगळ्यांना, महोत्सवासाठी नोंदणी करण्याचं आणि महोत्सवाला येण्याचं आमंत्रण मी देतो. असं फिल्म्स डिव्हिजन चे महसंचालक आणि मिफ्फचे संचालक रवींद्र भाकर यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषदेत या महोत्सवाची माहिती दिली. या महोत्सवासाठी, 18 वर्षावरील वयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असेल, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं त्यांच्यासाठी प्रवेश शुल्क आकारलेलं नाही,असंही त्यांनी स्पष्ट केलं. 17 वा मिफ्फ मिश्र स्वरुपात म्हणजे, अर्धा, प्रत्यक्ष तर अर्धा ऑनलाईन होईल, अशी माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) या साठी पुढाकार घेत, ऑनलाईन प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.

आपली कीर्ती कायम ठेवत, मिफ्फ ला यंदाही जगभरातील चित्रपट निर्मात्यांकडून, अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षीच्या मिफ्फसाठी 30 देशांतून 808 चित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्या असं भाकर यांनी सांगितलं. या महोत्सवात, 120 चित्रपट ‘स्पर्धा’ आणि ‘मिफ्फ प्रीझम’ श्रेणीत दाखवले जाणार आहेत. त्याशिवाय, स्पेशल चित्रपट पॅकेजेस, चित्रपट रासिकांसाठी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळा देखील महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.

नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज माइटी लिटिल भीम: आय लव्ह ताजमहल च्या एपिसोडचा वर्ल्ड प्रीमियर मिफ्फ 2022 मध्ये केला जाईल. त्याशिवाय, भारत-जपान यांनी सहनिर्मितीतून पहिल्यांदाच बनवलेला अॅनिमेशन पट रामायण: द लिजंड ऑफ प्रिन्स रामा चे देखील विशेष प्रक्षेपण मिफ्फ मध्ये असणार आहे. हा अ‍ॅनिमेशन पट पहिल्यांदा 30 वर्षांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आला होता.

यावेळी महोत्सवाच्या संचालकांनी, फिल्म्स डिव्हिजन राबवत असलेल्या इतर उपक्रमांचीही माहिती दिली. आम्हाला, या चित्रपट कलेला व्यवसाययिक दृष्ट्या प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींशी संपर्क साधून, समन्वय साधतो आहोत. यातून चित्रपट निर्मात्यांसाठी, ‘बी टू बी’ म्हणजेच व्यवसाय-ते-व्यवसाय अशा अमर्याद संधी निर्माण होतील.

ठळक वैशिष्ट्ये :

  • बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, यंदा, ह्या देशाची कंट्री ऑफ फोकस म्हणून निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत, बांग्लादेशातील 11 चित्रपट महोत्सवात दाखवले जातील. यात, समीक्षकांनी वाखाणलेल्या हसीना- अ डॉटर्स टेल’ ह्या चित्रपटाचाही समावेश आहे.
  • भारतात, माहितीपट निर्मितीत फिल्म्स डिव्हिजनच्या योगदानाबद्दलची माहिती देखील एक विशेष पॅकेज, इमेज नेशन मधून दाखवली जाईल.
  • इतर विशेष पॅकेज, जसे की ऑस्कर फिल्म पॅकेज, शॉर्ट्स टीव्ही , इटली आणि जपानच्या चित्रपटांचे विशेष पॅकेज, इंडियन पॅनोरामा- इफफीमध्ये अलीकडेच दाखवण्यात आलेले चित्रपट देखील रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असणार आहे.
  • विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष पॅकेजमध्ये, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट, कोलकाता, महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे, के. आर. नारायणन फिल्म इंस्टिट्यूट केरळ अशा विविध नामवंत संस्थांनी बनवलेले चित्रपट असणार आहेत. त्याशिवाय, म्यानमार चे अ‍ॅनिमेशनपट आणि माहितीपट, अ‍ॅनिमेशन फिल्म फेस्टिवल ब्राझील चे ही चित्रपट यावेळी दाखवले जातील.
  • त्याशिवाय, ईशान्य भारतविषयक चित्रपट, पॉकेट फिल्म्स प्लॅटफॉर्म मधील लघुपट, त्याशिवाय, सत्यजित रे यांच्या नष्ट झालेल्या, सुकुमार रे’ या चित्रपटाची पुनरुज्जीवित केलेली चित्रफीत देखील यावेळी दाखवली जाईल.
  • इतर वैशिष्ट्ये म्हणजे, भारतीय माहितीपट निर्माते-दिग्दर्शक यांची मुक्त चर्चा आणि इंडिया टुरिझम ने आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रमही या महोत्सवात असतील.

मास्टरक्लासेस

मिफ्फ  2022 मध्ये चित्रपट उद्योग क्षेत्रातील तज्ञ  व्यक्तींद्वारे मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचे आयोजन केले  जाईल. पद्मश्री रसुल पुकुट्टी  यांचे 'चित्रपटातील आवाजाचे सौंदर्यशास्त्र’, माध्यम व्यावसायिक रिझवान अहमद यांचे  ‘स्क्रीनपासून ओटीटी  प्लॅटफॉर्म्सपर्यंत विस्तारित सिनेमा-  कोविड पश्चात युगातील सिनेमा ' हे मिफ्फ-2022 मधील काही मास्टरक्लास आहेत.

ऑस्कर आणि ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) चे ज्युरी कार्टर पिल्चर 'ऑस्करसाठी पात्र चित्रपट '  या विषयावर माहिती देतील.

ॲनिमेशन फिल्म डिझायनर पी सी सनथ यांची ‘व्हीएफएक्स: द एव्हर-इव्हॉल्व्हिंग टूल फॉर स्टोरीटेलिंग’ वरील कार्यशाळा देखील चित्रपट रसिकांसाठी पर्वणी असेल.

पुनरावलोकन  आणि श्रद्धांजली

अ‍ॅनिमेशन प्रेमींना पोर्तुगाल, रशिया आणि कॅनडा या तीन देशांमधील जुन्या सिनेमांच्या पॅकेजचा आस्वाद घेता येईल. पोर्तुगीज ॲनिमेटर रेजिना पेसो यांचे चित्रपट; रशियन ॲनिमेशन दिग्दर्शक, अलेक्झांडर पेट्रोव्ह; कॅनेडियन ॲनिमेटर आणि चित्रकार जेनेट पर्लमन यांचे चित्रपट ॲनिमेशन प्रेमींसाठी पर्वणी असेल.

माहितीपट  आणि अ‍ॅनिमेशन शैलीतील चित्रपट दिग्दर्शक जे अलिकडच्या काळात आपल्याला सोडून गेले,  त्यांचे  ‘होमेज’ विभागांतर्गत विशेष स्क्रीनिंगसह स्मरण केले  जाईल: यात  कॅनडाचे  पिन स्क्रीन ॲनिमेटर, जॅक्स द्रुईन; इटलीची पहिली महिला माहितीपट दिग्दर्शक सेसिलिया मांगिनी; भारतीय दिग्गज बुद्धदेव दासगुप्ता; अष्टपैलू  सुमित्रा भावे; मणिपूरमधील प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्रकार इरोम माईपाक यांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण शंख; ‘इंडिया@75’ या विषयावरील चित्रपटासाठी विशेष पुरस्कार

17 व्या मिफ्फ  मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार, सुवर्ण शंख हा या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला प्रदान केला जाईल. हा 10 लाखांचा  रोख पुरस्कार आहे. इतर पुरस्कारांमध्ये चांदीचा शंख, चषक आणि प्रमाणपत्रासह पाच ते एक लाखांपर्यंतचे रोख पुरस्कार आहेत.

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठी एक लाख आणि ट्रॉफी चा  आयडीपीए पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कारही समारोपाच्या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे.

10 लाख रुपये रोख, चषक आणि प्रशस्तीपत्र  असे स्वरूप असलेला प्रतिष्ठित डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार  महोत्सवात दरवर्षी  माहितीपट आणि भारतातील चित्रपट  चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल चित्रपट दिग्दर्शकाला  प्रदान केला जातो. 4 जून रोजी समारोप समारंभात विविध स्पर्धा श्रेणीतील पुरस्कार प्रदान केले जातील.

या वर्षी नव्याने समावेश करण्यात आलेल्या  विशेष पुरस्कार श्रेणीबद्दल बोलताना,  फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक म्हणाले  की, 'इंडिया@75' संकल्पनेवरील  सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी एक लाख रुपये रोख आणि चषक असा  विशेष पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. .

महोत्सवाशी संबंधित प्रश्न किंवा शंका विचारायच्या असतील तर चित्रपट महोत्सव संचालनालयाशी  miffindia[at]gmail[dot]com वर संपर्क साधता येईल.

 

 

 

PIB MIFF Team | GC/SP/RA/SK/PM/MIFF-1

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825186) Visitor Counter : 193