कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

संयुक्त अरब अमिरातीला पाठविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी वाराणसी येथे स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात येणार


कौशल्यावर आधारित सहकार्य वाढविण्याच्या कार्यात सर्व संबंधित भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी सर्वसमावेशक संस्थात्मक आराखडा विकसित करणे आणि त्याला बळकटी देणे याला भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांची मान्यता

Posted On: 12 MAY 2022 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022


 

वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र उभारणे आणि भारतातील कुशल युवकांना मालवाहतूक, कार्यवाहीपश्चात कामे आणि तत्सम क्षेत्रामध्ये परदेशात उपलब्ध  रोजगार संधींचा लाभ घेता यावा म्हणून एनएसडीसी इंटरनॅशनल अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि हिंदुस्तान पोर्टस डीपी वर्ल्ड या कंपनीच्या भारतातील शाखेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. भारतातील उमेदवारांना जागतिक बाजारांमध्ये रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने सुसज्ज करण्यासाठी वाराणसी येथील हे आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र या युवकांना आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार कौशल्य प्रशिक्षण देणार आहे.केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योजकता आणि लघु तसेच मध्यम उद्योग राज्यमंत्री डॉ.अहमद बेलहोल अल फालसी, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सचिव राजेश अगरवाल,संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे राजदूत संजय सुधीर तसेच डीपीवर्ल्ड सबकॉन्टिनेन्ट चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिझवान सोमर यांच्या उपस्थितीत एनएसडीसी इंटरनॅशनलचे संचालक वेदमणी तिवारी आणि डीपी वर्ल्डचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि एचपी

पीएलचे संचालक मोहम्मद अल मौलेम यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून दस्तावेजांचे आदानप्रदान केले.
 
संयुक्त अरब अमिरात आणि जगभरातील इतर देशांसाठी भारत हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे ही बाब केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधोरेखित केली. भारतातील युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक बाबतीत भविष्यकाळासाठी सज्ज करण्यासाठी सरकार कार्य करत आहे याकडे त्यांनी निर्देश केला.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये कुशल व्यावसायिकांना असलेल्या महत्त्वावर जोर देत डॉ.अहमद बेलहोल अल फालसी म्हणाले की, या सहकार्य करारामुळे दोन्ही देशांमध्ये कौशल्य विकासाला अधिक वेग मिळेल आणि दोन्ही अर्थव्यवस्थांमधील कामगार बाजाराला गरज असलेल्या नवनव्या कौशल्य विषयक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.


S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824923) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi