मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी 20 व्या पशुगणनेवर आधारित पशुधन आणि कुक्कुटपालनाचा प्रजातीनिहाय अहवाल केला जारी

Posted On: 12 MAY 2022 2:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022

 

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे मंत्री परशोत्तम रुपाला यांनी 20 व्या पशुगणनेवर आधारित पशुधन आणि कुक्कुटपालनाचा प्रजातीनिहाय अहवाल आज जारी केला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

रुपाला यांनी पशुधनाच्या उन्नतीसाठी या अहवालाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आणि धोरणकर्ते आणि संशोधकांना होणाऱ्या त्याच्या उपयुक्ततेवर भर दिला. 20 व्या पशुधन गणना 2019 यामध्ये पशुधनाची प्रजातीनिहाय माहिती संकलीत करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच प्रजातीनिहाय अशी माहिती संकलित करण्यासाठी कागदपत्रांचा वापर करण्याऐवजी टॅब्लेट कॉम्प्युटर वापरून,ही गणना करण्यात आली; जो खरोखरच एक अतिशय नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.राष्ट्रीय पशुधन अनुवंशिक  संशोधन प्राधिकरण (NBAGR, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस) द्वारे मान्यताप्राप्त पशुधन तसेच कुक्कुट पक्ष्यांची गणना त्यांच्या प्रजातींनुसार करण्यात येते. पशुधन क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता, धोरण निर्मात्यासाठी आणि संशोधकांसाठी पशुधनाच्या विविध प्रजातींची पडताळणी करणे ही अत्यावश्यक बाब  असते, जेणेकरुन पशुधनांच्या  प्रजातींचे उत्पादन आणि इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुवांशिकदृष्ट्या त्यांच्यात सुधारणा करता येईल.

या अहवालात राष्ट्रीय पशुधन अनुवंशिक  संशोधन प्राधिकरण (NBAGR,नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस) द्वारे नोंदणीकृत 19 निवडक प्रजातींच्या 184 मान्यताप्राप्त देशी/विदेशी आणि संकरित प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.  या अहवालात 41 मान्यताप्राप्त देशी वाण आहेत तर 4 विदेशी/संकरित वाणांचा समावेश आहे.

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824692) Visitor Counter : 615