गृह मंत्रालय
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त, दूरदर्शी आणि तेजस्वी शास्त्रज्ञांना आणि भारताला अणुशक्ती बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना मी अभिवादन करतो.
पोखरण चाचणी भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचे आणि दिवंगत अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दूरदृष्टीचे ज्वलंत उदाहरण आहे.
तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात भारताची प्रगती खरोखरच उल्लेखनीय आहे.
Posted On:
11 MAY 2022 7:59PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शास्त्रज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विट संदेशामध्ये अमित शहा म्हणाले, “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त दूरदर्शी आणि तेजस्वी शास्त्रज्ञांना आणि भारताला अणुशक्ती बनवण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांना मी अभिवादन करतो. पोखरण चाचणी भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचे आणि दिवंगत अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दूरदृष्टीचे एक ज्वलंत उदाहरण आहे.”
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमची प्रगती झपाट्याने झाली आहे आणि डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानासारख्या त्यांच्या धोरणांनी पाया घातला आहे" असे अमित शहा यांनी आज सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, “तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात भारताची प्रगती खरोखरच उल्लेखनीय आहे. कोविड-19 महामारी दरम्यान, पीपीई किट्स, मास्क आणि विविध लसी यासारखी आवश्यक सामग्री विक्रमी वेळेत विकसित करून आमच्या तंत्रज्ञांनी हे दाखवून दिले की ते कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात.”
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824547)
Visitor Counter : 236