सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

निर्दिष्ट क्षेत्रांमध्ये एम.एस.एम.इ. उद्योगांच्या वाढीसाठीची लक्ष्ये नियत कालावधीत गाठण्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश, एम.एस.एम.इ. रूपे क्रेडिट कार्डांच्या दुसऱ्या टप्प्याचा केला प्रारंभ

Posted On: 10 MAY 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2022

 

निर्दिष्ट क्षेत्रांमधील एम.एस.एम.इ. अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठीची लक्ष्ये नियत कालावधीत गाठण्याचे आदेश केंद्रीय एम.एस.एम.इ. मंत्री नारायण राणे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज एम.एस.एम.इ.विषयक राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. एम.एस.एम.इ. शी संबंधित संस्थांचा विकास, चाचणी केंद्रे आणि तंत्रज्ञान केंद्रे अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आकार देण्यासाठी या परिषदेचा उपयोग होईल, असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला. 

या परिषदेत केंद्रीय मंत्री राणे यांनी, एम.एस.एम.इ. रूपे क्रेडिट कार्डांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभही केला. NPCI अर्थात भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ आणि 'कोटक महिंद्रा बँक', 'बँक ऑफ बरोडा', 'एसबीएम बँक (इंडिया)' आणि 'एचडीएफसी बँक' या संस्थांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. एम.एस.एम.इ. उद्योगांना व्यवसायाशी निगडित कार्यान्वयन खर्च करण्यासाठी, या कार्डामुळे पैसे भरण्याची (भरणा) सोपी व्यवस्था उपलब्ध होईल.

* * *

S.Kane/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824275) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi