PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 09 MAY 2022 7:25PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 190.34 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 20,403
  • Active cases stand at 0.05%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 3,410 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,25,60,905
  • 3,207 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.95%)
  • Weekly Positivity Rate (0.82%)
  • 84.10 cr Total Tests conducted so far; 3,36,776 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 9 मे 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

कोविनमधील  तांत्रिक त्रुटींमुळे पुणे जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतल्याची दोन प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत असा आरोप करणारी काही वृत्त प्रसारित झाली आहेत.

कोविनने भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी डिजिटल आधारस्तंभ म्हणून यशस्वीपणे सेवा पुरवली आहे. या मंचावर नोंदणी केलेल्या भारतातील 100 कोटींहून अधिक नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 190 कोटी मात्रा देण्यासाठी कोविन मंचाने सुविधा उपलब्ध केली आहे.

मानवी पद्धतीने माहिती भरताना राहून गेलेल्या त्रुटीला तंत्रज्ञानविषयक बिघाड संबोधणे हा अगदी निराधार युक्तिवाद आहे. जर प्रणालीमध्ये माहिती भरताना मानवी चूक झाली असेल तर कोविन प्रणाली अशा शक्यतांकडे दुर्लक्ष करत नाही, तर मजबूत तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीची सुविधा देऊ करते. जनतेच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच खुल्या असणाऱ्या कोविन प्रणालीमध्ये ‘रेझ अॅन इश्यू’ अर्थात ‘तुमच्या समस्या मांडा’ अशा प्रकारची ऑनलाईन सोय समाविष्ट केलेली आहे. सामान्यपणे पाहण्यात येणाऱ्या आणि अधिक प्रमाणात नोंदल्या गेलेल्या आठ प्रकारच्या समस्या या प्रणालीत नोंदवलेल्या असून ग्राहक सेवा केंद्रांवर जाऊन डिजिटल पद्धतीने त्याचे निराकरण करण्यासाठीची सुविधा तसेच हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीचे नाव, वय आणि लिंग तसेच दोन्ही वेळा ज्या नावांनी नोंदणी झाली त्याची व्यवस्थित माहिती त्या व्यक्तीला असेल तर अशी व्यक्ती त्यांच्या दोन्ही मात्रांची माहिती सहजपणे एकत्रित करू शकेल.    

कोविन हा अत्यंत विविधांगी मंच असून  देशातील संपूर्ण लोकसंख्येसाठी विक्रमी वेगाने त्याची रचना करण्यात आली आहे. मात्र या मंचासंदर्भातील मानवी त्रुटीला तांत्रिक बिघाडाचे नाव देऊन सार्वजनिक हितासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आणि या मंचाचे परिचालन करणाऱ्या पथकाच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त करणे खरोखरीच निराशाजनक आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823958) Visitor Counter : 118


Read this release in: English , Hindi , Manipuri