युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते भारतीय क्रीडा प्राधिकरण - पतियाळा येथे दोन नव्या प्रकल्पांची पायाभरणी; हे प्रकल्प म्हणजे संस्थेच्या  61 व्या स्थापना दिनानिमित्त खेळाडूंना मिळालेली भेट – केंद्रीय क्रीडा  मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 07 MAY 2022 10:24PM by PIB Mumbai

 

एसएआय अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पतियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुख्य संस्थेच्या ठिकाणी दोन नव्या प्रकल्पांची कोनशीला ठेवली. पतियाळाच्या नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सुधारणा करण्याच्या कार्यक्रमाचा हा भाग असून केंद्र सरकार त्यामध्ये येत्या 3 वर्षांत 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक करणार आहे.

यातील पहिला प्रकल्प म्हणजे उच्च तंत्रज्ञानयुक्त क्रीडा विज्ञान प्रयोगशाळा तसेच पदविका धारकांच्या शिक्षणासाठी क्षमता आणि  जडणघडणीसाठी  सभागृहासह राष्ट्रीय क्रीडा केंद्राची उभारणी.

नव्या पायाभूत सुविधांमध्ये खेळाडूंना धावण्यासाठी इनडोअर  3 पदरी मार्गिकासंपूर्ण पुनर्वसन तसेच पुनर्चालना व्यायामशाळेचा समावेश  आहे. या क्षमता आणि सभागृहामध्ये एकाच वेळी 150 खेळाडू सामावले जाऊ शकतात आणि ही देशातील अनेक सर्वात मोठ्या अशा सुविधांपैकी एक असेल.

यातील दुसरा प्रकल्प म्हणजे संपूर्णपणे मध्यवर्ती वातानुकूलित स्वयंपाकघर आणि फूड कोर्ट यांची उभारणी. याठिकाणी 400 लोकांना बसून जेवण्यासाठी सोय असेल आणि 2000 भोजन थाळ्या तयार करण्याची क्षमता असलेले मॉड्युलर पद्धतीचे स्वयंपाकघर असेल.

या मालिकेतील तिसरा प्रकल्प म्हणजे वसतिगृहाची क्षमता 450 ने वाढविण्यासाठी संस्थेच्या परिसरात वसतीगृहाच्या दोन नव्या वसतीगृह इमारतींची उभारणी करणे.

या प्रकल्पांचे महत्त्व विषद करताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, पतियाळाची नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था म्हणजे भारतातील प्रमुख क्रीडा संस्था आहे आणि या संस्थेच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त हे नवे प्रकल्प म्हणजे क्रीडापटूंना मिळालेली भेट आहे. उत्तम, आरोग्यपूर्ण जेवण तसेच पुनर्वसन आणि पुनर्चालना या प्रत्येक खेळाडूच्या प्राथमिक गरजा आहेत आणि म्हणून या दोन प्रकल्पांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची गरज आहे असे सर्वांना वाटत होते. हे दोन प्रकल्प वर्ष 2022-23 मध्ये सुरु करण्यासाठी निश्चित झालेल्या 13 पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी आहेत. देशातील खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण मिळणे आणि त्यांना त्यांच्या क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता येणे सुनिश्चित करण्यासाठी वर्ष 2014 ते 2021 या दरम्यान 23 प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी 268 एकरच्या परिसरावर पसरलेल्या संस्थेच्या इतर भागांना भेट दिली तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेच्या अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा केली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823580) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi