संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पीसी लाल स्मृती व्याख्यानमालेत बीजभाषण

Posted On: 03 MAY 2022 2:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2022

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 05 मे 2022 रोजी 37 व्या एअर चीफ मार्शल पीसी लाल स्मृती व्याख्यानमालेत बीजभाषण करणार आहेत. वायुसेना संघटनेने व्याखानाचे आयोजन केले आहे. नवी दिल्लीत सुब्रतो पार्क, वायुसेना सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता हे व्याख्यान होणार आहे.

वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, वायुसेना संघटनेचे अध्यक्ष एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया (निवृत्त) आणि आयएएफचे सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याआधी 2019 मध्ये संबंधित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

एअर चीफ मार्शल (वायुसेना प्रमुख) पीसी लाल यांची 1939 मध्ये आयएएफमध्ये नियुक्ती झाली. त्यांना दुसऱ्या महायुद्धात बर्मा मोहिमेदरम्यान डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस प्रदान करण्यात आला होता.  1965 च्या युद्धात त्यांनी वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून काम केले. 1966 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधे (एचएएल) प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.  1971 च्या युद्धादरम्यान 7 वे वायुसेना प्रमुख म्हणून, त्यांचे उत्कृष्ट नेतृत्व भारताच्या विजयासाठी आणि बांगलादेशच्या मुक्तीसाठी निर्णायक घटक ठरले.  दोन युद्धांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 1966 मध्ये पद्मभूषण आणि 1972 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.  1973 मध्ये निवृत्तीनंतर, त्यांची इंडियन एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) आणि नंतर एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

 

 

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1822306) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil