वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत - संयुक्त अरब अमिरात सर्वसमावेशक वित्तीय  भागीदारी कराराची  (सीईपीए) अंमलबजावणी सुरु

Posted On: 01 MAY 2022 4:49PM by PIB Mumbai

 

ऐतिहासिक भारत-संयुक्त अरब अमिरात सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी कराराची (CEPA)  अधिकृतपणे अंमलबजावणी आजपासून सुरु झाली. या करारावर उभय देशांनी  18 फेब्रुवारी 2022 रोजी  स्वाक्षरी केली होती.

नवी दिल्लीतील न्यू कस्टम हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भारत-संयुक्त अरब अमिरात  सर्वसमावेशक वित्तीय  भागीदारी कराराअंतर्गत  भारतातून संयुक्त अरब आमिरातीला पाठवण्यात येणाऱ्या आभूषणे उत्पादनांचा समावेश असलेल्या  मालाच्या पहिल्या खेपेला वाणिज्य विभागाचे सचिव,बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांनी आज रवाना केले.

ऐतिहासिक करार कार्यान्वित करण्याच्या या प्रतिकात्मक कृतीनंतर, भारत सरकारचे माननीय वाणिज्य सचिव बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांनी रत्न आणि आभूषण क्षेत्रातील तीन निर्यातदारांना मूळ उत्पादक प्रमाणपत्रे सुपूर्द केली.या करारांतर्गत आता शून्य सीमाशुल्क लागू असलेली उपरोक्त मालाचे खेप  आज 01 May 2022 रोजी दुबईला पोहोचणे अपेक्षित आहे.

भारतातुन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात येणाऱ्या निर्यातीत रत्न आणि आभूषण  क्षेत्राचा मोठा वाटा आहे आणि या  क्षेत्राला भारत-संयुक्त अरब अमिरात  सर्वसमावेशक वित्तीय  भागीदारी कराराअंतर्गत भारतीय उत्पादनांसाठी मिळणाऱ्या शुल्क  सवलतींमधून लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे.भारत-संयुक्त अरब अमिरात सर्वसमावेशक वित्तीय  भागीदारी कराराअंतर्गत, येत्या पाच वर्षांत 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार  आणि 15 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्यापेक्षा अधिक सेवांमधील व्यापार करणे अपेक्षित आहे.

या करारामध्ये 100 अब्ज डॉलर्स मूल्याच्या व्यापाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे भारताच्या बाजारपेठेचा आकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या भारताला मिळणारा प्रवेश लक्षात घेताबरेच काही साध्य केले जाऊ शकते, असे या कार्यक्रमात बोलताना वाणिज्य सचिवांनी सांगितले. हा करार उभय देशांच्या नेत्यांच्या दूरदृष्टीने तयार करण्यात आला असल्याचे  नमूद करत  वाणिज्य सचिव म्हणाले की, भारतासाठी संयुक्त अरब अमिरात  हा देश  जगाचे प्रवेशद्वार असेल.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821812) Visitor Counter : 323


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu