ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्राने अनिवार्य प्रमाणीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली; 1 जून 2022 पासून येणार अमलात

Posted On: 30 APR 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2022

 

सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (सुधारणा) आदेश, 2022 नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा दुसरा टप्पा 1 जून 2022 पासून अमलात येईल.

भारतीय मानक 1417अंतर्गत अनिवार्य प्रमाणीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सोन्याच्या दागिन्यांची/कलाकुसरीच्या वस्तूंच्या अधिकच्या 20, 23 आणि 24 या तीन कॅरेटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी 32 नव्या जिल्ह्यांत अनिवार्य प्रमाणीकरणासंबंधातील AHC स्थापन करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांची यादी BIS च्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र सरकारने हा आदेश 4 एप्रिल 2022 रोजी जारी केला.

BIS ने 23 जून 2021 पासून देशाच्या 256 जिल्ह्यांत अनिवार्य प्रमाणीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे, ज्यात HUID सोबत रोज 3 लाखाहून जास्त सोन्याच्या वस्तूंचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

BIS ने सामान्य लोकांना आपल्या अप्रमाणित सोन्याच्या दागिन्यांचे कुठल्याही BIS प्रमाणित मुल्यांकन आणि प्रमाणीकरण केंद्रांवर प्रमाणीत करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर सामान्य जनतेच्या दागिन्यांचे प्रमाणीकरण प्राधान्याने करून त्याचा चाचणी अहवाल ग्राहकांना देण्यात येईल. हे प्रमाणपत्र ग्राहकांना त्यांच्या मिळाल्यानंतर दागिन्यांच्या शुद्धतेची खात्री पटेल आणि त्यांच्याकडे असलेले दागिने विकताना याचा उपयोग होईल.

या चाचणीचे शुल्क अशा प्रकारे असेल, 4 दागिन्यांपर्यंत 200 रुपये, तसेच 5 किंवा त्यापेक्षा जास्त दागिन्यांसाठी प्रती दागिना 45 रुपये.

BIS च्या संकेतस्थळाच्या www.bis.gov.in  या होम पेजवर ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चाचणीविषयी मार्गदर्शक तत्वे आणि मान्यताप्राप्त मुल्यांकन आणि प्रमाणीकरण केंद्रांची यादी उपलब्ध आहेत.

BIS केयर ॲपवरून HUID क्रमांकासह प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांची तपासणी ‘verify HUID’ या सदरात करून घेता ह्येईल. हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येऊ शकते.


* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821672) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia