युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आढावा : तलवारबाजीत गुरुनानक देव विद्यापीठाच्या जेटली सिंहची सुवर्णपदकाला गवसणी; नेमबाजी आणि तिरंदाजीमध्ये मोठे उलटफेर; खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांसाठी सज्ज
Posted On:
30 APR 2022 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2022
उद्यापासून सुरू होणार्या भव्य अॅथलेटिक्स स्पर्धांवर सगळ्यांचे लक्ष लागले असून , खेलो इंडिया क्रीडा 2021 मध्ये आज खूप स्पर्धांनी भरगच्च असा दिवस संपला. दिवसअखेरीस 42 विद्यापीठांनी सुवर्णपदक पटकावले तर 92 विद्यापीठांनी पदकतालिकेत स्थान मिळवले. स्पर्धेत आज पिस्ट आणि तलवारबाजीमध्ये 13 पदके जिंकण्याची संधी होती.
गुरू नानक देव विद्यापीठाच्या चिंगाखम जेटली सिंह ने पुरुषांच्या तलवारबाजीमध्ये आपल्याच संघातील शुभमला पराजित करत सुवर्णपदक मिळवले. टॉप्स योजनेतील खेळाडू असलेला जेटली, हा गुरुनानक देव विद्यापीठाने आज जिंकलेल्या चार पदक विजेत्यांपैकी एक होता. जेटली अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक होता जो उलटफेर होत असतानाही त्या दिवशी टिकून राहिला.
शहरातील एसएआय एनसीओई सेंटर, येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये सर्वात मोठा उलटफेर दिसून आला. लव्हली व्यावसायिक विद्यापीठाच्या सरताज सिंह तिवाना याने पुरुषांच्या 50 मीटर 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत ऑलिम्पिकपटू ऐश्वर्य प्रताप सिंहचा तोमरचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.गुरू नानक देव विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारा तोमर पात्रतेच्या शेवटच्या फेरीत अव्वलस्थानी होता.
तिरंदाजीतही मोठे उलटफेर पाहायला मिळाले. अव्वलस्थानासाठी चढाओढ पाहायला मिळाली. पुरुषांच्या रिकर्व प्रकारात पहिल्या बाद फेरीत, पात्रतेत अव्वल स्थानी असलेल्या लव्हली व्यावसायिक विद्यापीठाच्या आदित्य चौधरीने चरणसिंग विद्यापीठाच्या निशांतला नमवले. . महिला रिकर्व्ह स्पर्धेमध्ये अॅडमास विद्यापीठाच्या रुमा बिस्वासने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिने बाद फेरीत स्थान निश्चित केलेल्या रूमचा उपांत्य फेरीत गुरु जंबेश्वर विद्यापीठाच्या भावनाने पराभव केला.
संध्याकाळ होताच — शहरात हलका पाऊस पडला — चाळीसहून अधिक स्पर्धांमधील ट्रॅक आणि फील्ड खेळाडू सरावासाठी ट्रकवर दिसले. त्यांच्यामध्ये देशातील काही सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू होते - यात निश्चितच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता दुती चंद देखील होती. चंद व्यतिरिक्त 400 मीटर धावपटू प्रिया मोहन आणि लांब उडीपटू अँसी सोजन या देखील आपापल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.
स्पर्धा सकाळी लवकर सुरू होईल, दोन लांब अंतराच्या धावण्याच्या स्पर्धा (पुरुष आणि महिला 10,000 मी) प्रथम होतील. दिवसभरात 12 पदके जिंकण्याची संधी आहे. यातील पुरुष आणि महिला 100 मी.स्पर्धा मुख्य आकर्षण आहे. 19. 50 वाजता होणार्या महिलांच्या 100 मीटर शर्यतीत दुती चंदवर सगळ्यांचे लक्ष आहे.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821570)
Visitor Counter : 190