सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

भारतातील सर्व एफएमसीजी कंपन्यांना मागे टाकत 2021-22 मध्ये खादीने 1 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा केला पार

Posted On: 30 APR 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2022

 

भारतातील सर्व एफएमसीजी  कंपन्यांना  मागे टाकत  खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) नवी उंची गाठली आहे. यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सतत दिलेल्या   पाठिंब्याबद्दल धन्यवाद देत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रथमच 1.15 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, ही उलाढाल  देशातील कोणत्याही एफएमसीजी  कंपन्यांच्या उलाढालींपेक्षा  लक्षणीय आहे. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही देशातील एकमेव कंपनी आहे जिने  1 लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची एकूण उलाढाल 1,15,415.22 कोटी रुपये होती , आधीच्या वर्षी ही उलाढाल  2020-21   95, 741.74 कोटी रुपये होती. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने उलाढालीत 2020-21 या वर्षापासून 20.54% ची वाढ नोंदवली आहे.2014-15 च्या तुलनेत, 2021-22 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील एकूण उत्पादनात 172% ची प्रचंड वाढ झाली आहे तर या कालावधीत एकूण विक्री  248% पेक्षा जास्त वाढली आहे. कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे, 2022 मध्ये एप्रिल ते जून या पहिल्या 3 महिन्यांत देशात अंशतः   टाळेबंदी असतानाही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची ही मोठी उलाढाल आहे.

खादी आणि ग्रामोद्योगाचे  आयोगाचे  अध्यक्ष,  विनय कुमार सक्सेना यांनी ,खादीच्या उलाढालीत अभूतपूर्व वाढीचे श्रेय हे देशात खादीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  सतत दिलेल्या पाठिंब्याला दिले.त्याचवेळी, नाविन्यपूर्ण योजना, सर्जनशील विपणन नवकल्पना आणि विविध मंत्रालयांचे सक्रिय पाठबळ  यामुळे अलीकडच्या वर्षांत खादीच्या प्रगतीत भर पडली आहे. आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी   "स्वदेशी" आणि विशेषत: "खादी" चा प्रचार करून  पंतप्रधानांनी  वारंवार केलेल्या आवाहनामुळे ही  आश्चर्यकारक वाढ नोंदवण्यात आली आहे., आज खादी देशातील सर्व एफएमसीजी कंपन्यांपेक्षा आघाडीवर आहे, असे त्यांनी सांगितले. 

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821566) Visitor Counter : 200