संरक्षण मंत्रालय
सरकारी ई-मार्केट GeM मधून संरक्षण मंत्रालयाने वर्ष 2021-22 या एकाच आर्थिक वर्षात 15,000 कोटी रुपयांची खरेदी करत केला आजवरचा विक्रम
Posted On:
30 APR 2022 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2022
संरक्षण मंत्रालयाने सरकारी-ई मार्केट- GeM च्या माध्यमातून 2021-22 या आर्थिक वर्षात, 15,047.98 कोटी रुपयांची सर्वोच्च खरेदी करत, नवा विक्रम रचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही जवळपास 250 टक्क्यांची झेप आहे. ऑगस्ट 2016 साली GeM या पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे, जुनी निविदा प्रक्रिया कालबाह्य झाली आणि सरकारी खरेदी प्रक्रिया अधिक निश्चित आणि पारदर्शक झाली. GeM ची सुरुवात झाल्यानंतर, संरक्षण मंत्रालयाने डिजिटल मोहिमेचा स्वीकार करत अगदी सहजपणे या पोर्टलवरुन खरेदी सुरु केली आहे. या खरेदीत प्रत्यक्षात अनेक अडचणी आल्या असतानाही मंत्रालयाने या खरेदीत विक्रम केला आहे.
डिजिटल इंडियाच्या संकल्पानुसार, डिजिटल व्यवहार आणि पारदर्शकता आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नात मोठे योगदान देण्यास संरक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821553)
Visitor Counter : 218