आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.89 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 2.86 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 18,684

गेल्या 24 तासात 3,688 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.74%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.66%

Posted On: 30 APR 2022 12:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.89 कोटींहून अधिक (1,88,89,90,935) मात्रांचा टप्पा पार केला. 2,32,98,421 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 2.86 कोटींहून अधिक (2,86,98,710) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405116

2nd Dose

10016505

Precaution Dose

4794775

FLWs

1st Dose

18415710

2nd Dose

17539302

Precaution Dose

7591757

Age Group 12-14 years

1st Dose

28698710

2nd Dose

6599218

Age Group 15-18 years

1st Dose

58425991

2nd Dose

42240428

Age Group 18-44 years

1st Dose

555713572

2nd Dose

478122094

Precaution Dose

148084

Age Group 45-59 years

1st Dose

202918252

2nd Dose

187948708

Precaution Dose

519876

Over 60 years

1st Dose

126863987

2nd Dose

117097204

Precaution Dose

14931646

Precaution Dose

27986138

Total

1888990935

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 18,684 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.74% इतका आहे. गेल्या 24 तासात 2,755 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,25,33,377. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,96,640 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.74 कोटींहून अधिक (83,74,42,023) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.74% नोंदविण्यात आला आहे. 

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821516) Visitor Counter : 158