परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
27 APR 2022 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022 मध्ये लिथुआनियामध्ये नवीन भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय उघडण्यास भारताच्या राजनैतिक पाऊलखुणा विस्तारण्यास, राजकीय संबंध आणि धोरणात्मक सहकार्य वाढण्यास, द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होईल, लोकांमधील परस्पर संपर्क दृढ होणे सुलभ होईल, बहुपक्षीय व्यासपीठांवर अधिक शाश्वत राजकीय व्याप्ती वाढण्यास अनुमती मिळेल आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांसाठी समर्थन मिळविण्यात मदत होईल. लिथुआनियामधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय भारतीय समुदायाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करेल आणि त्यांच्या हितांचे संरक्षण करेल.
लिथुआनियामध्ये नवीन भारतीय उच्चायुक्त कार्यालय उघडण्याचा निर्णय हा वृद्धी आणि विकास किंवा ‘सबका साथ सबका विकास’ या आपल्या राष्ट्रीय अग्रक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी एक पुढचे पाऊल आहे. भारताच्या राजनैतिक उपस्थितीत वाढ केल्याने, इतर गोष्टींबरोबरच, भारतीय कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि वस्तू आणि सेवांच्या भारतीय निर्यातीला चालना मिळेल. स्वावलंबी भारत किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ या आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने स्वदेशी उत्पादन आणि रोजगार वाढविण्यावर याचा थेट परिणाम होईल.
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820636)
Visitor Counter : 178