अर्थ मंत्रालय
143 वस्तूंवरील जीएसटी दर वाढविण्याविषयी अभिप्राय मागवल्याच्या, दिशाभूल करणाऱ्या कथित वृत्ताबद्दल स्पष्टीकरण
Posted On:
25 APR 2022 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022
असे निदर्शनास आले आहे की, केंद्र सरकारने राज्यांकडून सुमारे 143 वस्तूंवरील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे दर वाढविण्याविषयी अभिप्राय मागविल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे.
यापैकी काही वृत्तांमध्ये त्या वस्तूंची संख्या आणि वर्णन देखील प्रसिध्द झाले होते. तेव्हा असे स्पष्ट करण्यात येते की, सरकारने कोणत्याही विशिष्ट वस्तूंवरील जीएसटीचे दर वाढविण्याविषयी राज्यांकडून अभिप्राय मागवलेले नाहीत तसेच जीएसटीच्या दरांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे हे वृत्त केवळ अंदाजावर आधारित आहे आणि त्याला कोणत्याही तथ्याचा आधार नाही.
जीएसटी मंडळाने त्यांच्या 45 व्या बैठकीमध्ये जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना केली आहे. जीएसटी दरांबाबत या गटाची चर्चा सतत सुरु असते. सप्टेंबर 2021 मध्ये या मंत्रीगटाची स्थापना झाल्यानंतर लगेचच गटाच्या संदर्भ शर्तींवर सामान्यतः राज्यांची मते मागविण्यात आली होती. या गटाचा अहवाल अजून जीएसटी मंडळाकडे विचारार्थ सादर झालेला नाही.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820005)
Visitor Counter : 194