रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रासंबंधीच्या सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन; फार्मा आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील सीईओंबरोबर दोन गोलमेज परिषदांचे भूषवले अध्यक्षपद


आम्ही आरोग्यसेवा व्यवस्थेच्या ‘हील इन इंडिया आणि हील बाय इंडिया’ या दोन महत्त्वाच्या पैलूंप्रती वचनबद्ध,: डॉ. मनसुख मांडविया

भारत औषधनिर्माण क्षेत्रात जगात आघाडीवर आहे; वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्र 2025 पर्यंत 50 अब्ज डॉलरची बाजारपेठ बनण्याची शक्यता: भगवंत खुबा

Posted On: 25 APR 2022 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022

केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी 25 ते 27 एप्रिल या कालावधीत आयोजित औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रासंबंधी सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले. रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा, औषधनिर्मिती विभागाच्या सचिव एस अपर्णा, यावेळी उपस्थित होते. डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे ही वार्षिक तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, पंतप्रधानांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि नेतृत्वामुळे भारतातील आरोग्य सेवा प्रत्येकासाठी परवडणारी आणि सुगम्य  होत आहे. देशातील डॉक्टर, वैद्यकीय संस्था, रुग्णालय, अन्य सेवा केंद्रे, आरोग्य आणि  निरामयता  केंद्रांसारख्या  आरोग्यविषयक  पायाभूत सुविधांची संख्या वाढवण्यासाठी सरकार निरंतर  प्रयत्न करत आहे. "इंडिया फार्मा आणि इंडिया मेडिकल डिव्हाईस 2022 सारख्या परिषदा उद्योग, शैक्षणिक आणि धोरण निर्मात्यांना विचारमंथन करण्यासाठी आणि या क्षेत्रासाठी पुढील 25 वर्षांचा आराखडा तयार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून  करतात," असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तरुणांची ऊर्जा आणि बुद्धिमत्ता यांची सांगड घातली जात आहे. आपल्या देशातील तरुणच भारताला भविष्यात अधिक उंचीवर नेतील आणि म्हणून आपण उद्योग क्षेत्र आणि विद्यार्थी यांच्यातील सहकार्याला चालना दिली पाहिजे. यामुळे आपल्या तरुणांची रोजगारक्षम  तर होतीलच , त्याचबरोबर  उद्योगांना देखील कुशल मनुष्यबळ मिळेल असे ते म्हणाले.

कोविड-19 विरुद्ध भारताचा यशस्वी लढा सुनिश्चित केल्याबद्दल देशातील फार्मा उद्योगाचे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताने कोविड महामारीचे ज्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे तो जागतिक अभ्यासाचा विषय आहे .

केंद्रीय मंत्री म्हणाले की आपण एका नवीन भारताच्या उदयाचे साक्षीदार आहोत आणि सर्व संबंधितांनी  हे सुनिश्चित केले पाहिजे की फार्मा क्षेत्र देखील या वाढीचा एक भाग बनेल.  आम्ही आरोग्यव्यवस्थेच्या  ‘हील इन इंडिया आणि हील बाय इंडिया’  म्हणजेच, ‘भारतात उपचार घेऊन बरे व्हा आणि भारताच्या औषधी आणि उपकरणे वापरुन बरे व्हा’ या  दोन महत्त्वाच्या पैलूंप्रति वचनबद्ध आहोत असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले की, भारतीय फार्मा आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रात गुणवत्ता, सुलभता आणि किफायतशीर दर सुनिश्चित करण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारत हा  जगातील औषधनिर्मितीचे केंद्र असून  उत्पादन क्षेत्रात जगात 5 व्या क्रमांकावर आहे. भारतीय वैद्यकीय उपकरण निर्मितीक्षेत्राचे मूल्य सध्या 11 अब्ज डॉलर्स आहे आणि 2025 पर्यंत ते 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. सध्या भारतात 80 टक्क्यांहून अधिक वैद्यकीय उपकरणे आयात केली जातात.नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास यामुळे  भारत लवकरच  80 टक्के वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच तयार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

R.Aghor/S.Kane/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819901) Visitor Counter : 163