माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आयसीसीआरतर्फे भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर 3 आणि 4 मे 2022 ला दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
23 APR 2022 7:47PM by PIB Mumbai
आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक भारतीय परिषद आणि फ्लेम विद्यापीठ यांच्यातर्फे, येत्या 3 आणि 4 मे, 2022 रोजी, भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्य शक्ती याविषयी दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीसीआर चे अध्यक्ष, खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषदेत ही बातमी दिली. या चर्चासत्राद्वारे, भारतीय चित्रपटांचे अभ्यासक-समीक्षक आणि चित्रपट सृष्टीतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून चित्रपटांशी संबंधित विषयांवर चर्चा, परिसंवाद करत समकालीन महत्वाच्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न असणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होईल. तर, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सांगता समारंभ होईल, त्यात, सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी देखील उपस्थित राहतील, अशी माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
चर्चासत्राची पार्श्वभूमी :
भारतीय चित्रपट आज जगातल्या अनेक देशात लोकप्रिय असून, जगभरातील लोकांच्या मनात भारताच्या संस्कृतीविषयी एक संवेदनशील प्रतिमा निर्माण करण्याची ताकद या चित्रपट सृष्टीत आहे.माहिती तंत्रज्ञानाची वाढलेली व्याप्ती आणि परदेशस्थ भारतीयांची वाढलेली संख्या, यातून, भारतीय सिनेमाचा देशाबाहेर असलेला प्रभाव आपल्याला जोखता येणे शक्य आहे. चित्रपट, हे भारताचा प्रभाव वाढवणारे आणि लोकांच्या तसेच विविध देशातील सरकारांच्या मनात, भारताविषयी चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम चित्रपट हळूहळू करत आहेत.
या चर्चासत्रात पुढील विषयांवर सत्रे होतील :
1. चित्रपटातील वसाहतवाद : पाश्चिमात्य भिंगातून जागतिक आणि भारतीय चित्रपट
2. भारताविषयीचे चित्र/प्रतिमा देशाबाहेर निर्माण करण्यात भारतीय चित्रपटाचा उपयोग
3. भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला जागतिक प्रभाव
4. प्रादेशिक चित्रपट आणि त्याचं जागतिक प्रभाव
5. भारतीय चित्रपटांचा परदेशी प्रेक्षक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंध
या चर्चासत्रात सहभागी होण्याविषयी नोंदणीसाठी खाली क्लिक करा.
Seminar on "Indian Cinema & Soft Power": Registration Form (google.com)
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819394)
Visitor Counter : 277