आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 187.46 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.61 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,079

गेल्या 24 तासात 2,527 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.50%

Posted On: 23 APR 2022 11:56AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 187.46 (1,87,46,72,536)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,29,79,714 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.61 (2,61,95,248) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 3,10,701 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404669

2nd Dose

10011428

Precaution Dose

4677062

FLWs

1st Dose

18414845

2nd Dose

17531023

Precaution Dose

7302706

Age Group 12-14 years

1st Dose

26195248

2nd Dose

2344222

Age Group 15-18 years

1st Dose

58094473

2nd Dose

41179707

Age Group 18-44 years

1st Dose

555446538

2nd Dose

475009338

Precaution Dose

65670

Age Group 45-59 years

1st Dose

202877959

2nd Dose

187274923

Precaution Dose

245031

Over 60 years

1st Dose

126834923

2nd Dose

116662918

Precaution Dose

14099853

Precaution Dose

2,63,90,322

Total

1,87,46,72,536

 

भारतात रुग्णसंख्या सध्या  15,079 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे.गेल्या 24 तासांत 1,656 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,17,724 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,527 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,55,179  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.42 (83,42,81,170)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.50% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.56% आहे.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819211) Visitor Counter : 175