वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राज्यांनी एनआयसीडीसी प्रकल्पांचे काम जलदगतीने हाती घ्यावे आणि औद्योगिक गट आणि समूहांमधील जमिनीचे अधिग्रहण आणि वितरण यांच्यासाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करावी असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे राज्यांना निर्देश

Posted On: 22 APR 2022 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी एनआयसीडीसी अर्थात राष्ट्रीय औद्योगिक कॉरीडॉर महामंडळाच्या प्रकल्पांचे काम जलदगतीने हाती घ्यावे आणि औद्योगिक गट तसेच समूहांतील जमिनींचे अधिग्रहण आणि वितरण यांसाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करावी.

“18 राज्यांना त्यांची निर्णय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जमिनी देण्यास सांगितले आहे, असे झाले नाही तर आम्हाला हे प्रकल्प वेळेआधी बंद करावे लागतील आणि तेच प्रकल्प, वेगवान गुंतवणूक  करण्यास इच्छुक असणाऱ्या इतर राज्यांमध्ये सुरु करण्याचा विचार करावा लागेल,”असे गोयल म्हणाले. राष्ट्रीय औद्योगिक कॉरीडॉर विकास कार्यक्रमासंदर्भातील गुंतवणूकदार गोलमेज परिषदेला संबोधित करताना ते काल रात्री नवी दिल्ली येथे बोलत होते.

मात्र मालकीच्या नसलेल्या कोणत्याही जागेवर औद्योगिक एकके सुरु करता कामा नये असा इशारा देऊन केंद्रीय मंत्री म्हणाले कि ही एकके लवकरात लवकर उभारली गेली पाहिजेत जेणेकरून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि रोजगार निर्मिती सुरु होऊ शकेल.

“सरतेशेवटी, राष्ट्राची संपत्ती चागल्या कारणासाठी वापरली गेली पाहिजे. व्यापार व्यवस्थापन परिभाषेत आपण जसे म्हणतो की, ‘चला, आपण आपली मालमत्ता अधिकधिक प्रमाणात वापरूया, कोठेही उभारलेल्या कोणत्याही पायाभूत सुविधांचा जास्तीतजास्त वापर करून घेऊन शक्य असेल त्या कमाल मर्यादेपर्यंत उपयोग करून घेऊया,” असे ते म्हणाले.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरीडॉर महामंडळाच्या चार टप्प्यांमध्ये 32 प्रकल्पांचा समावेश असलेल्या 11 कॉरीडॉर्सची अंमलबजावणी सुरु करत आहे.

देशातील उद्योजकांना “निर्मितीच्या रूपातील मोठ्या बांधणी सामग्रीचा” लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देत केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले कि जगाला आपल्यासोबत व्यापार करायचा आहे आणि आता हि संधी कशी घ्यायची ते आपल्यावर अवलंबून आहे.विकसनशील देशाकडून विकसित देश म्हणून प्रगती करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण या अमृतकाळाचे शिपाई म्हणून कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1819010) Visitor Counter : 169