श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना ईपीएफओने फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 14.12 लाख ग्राहक जोडले
एकूण 9.52 लाख ग्राहक जोडून वेतनपटाच्या आकडेवारीत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्लीआघाडीवर
Posted On:
20 APR 2022 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने आज जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपटावरून असे दिसून आले आहे की ईपीएफओने फेब्रुवारी, 2022 मध्ये एकूण 14.12 लाख ग्राहक जोडले आहेत. वेतनपटाची महिन्यागणिक तुलना केल्यास जानेवारी, 2022 च्या तुलनेत फेब्रुवारी, 2022 मध्ये एकूण 31,826 ग्राहकांची जराशी वाढ दिसून येते. वर्षागणिक तुलना केल्यास 2021 च्या संबंधित महिन्यातील निव्वळ ग्राहक वाढीच्या तुलनेत फेब्रुवारी, 2022 मध्ये एकूण 1,74,314 ग्राहक जोडले गेले. ऑक्टोबर 2021पासून निव्वळ ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे जी संस्थेद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर विश्वास दर्शवते.
वेतनपटाची वयोनिहाय तुलना दर्शवते की फेब्रुवारी, 2022 मध्ये सर्वाधिक 3.70 लाख निव्वळ नावनोंदणीद्वारे 22-25 वयोगटातील ग्राहक आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ या महिन्यात 2.98 लाख निव्वळ ग्राहकांची भर टाकत 29-35 वर्षे वयोगटाचा क्रमांक लागतो. थोडक्यात, या महिन्यातील 18-25 वर्षे वयोगटातील एकूण नावनोंदणी सुमारे 45% आहे. हा वयोगट सूचित करतो की अनेक प्रथमच नोकरी शोधणारे कर्मचारी संघटित क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
देशभरातील वेतनपटाची तुलना ठळकपणे दर्शवते की महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमधील आस्थापने महिन्याभरात सुमारे 9.52 लाख निव्वळ ग्राहक जोडून आघाडीवर आहेत, जे सर्व वयोगटांचा विचार करता निव्वळ वेतनपटाच्या सुमारे 67.49% आहे.
लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की वेतनपटावर या महिन्याभरात अंदाजे 3.10 लाख महिला जोडल्या गेल्या.
उद्योग-निहाय वेतनपट सूचित करतो की या महिन्यात मुख्यतः दोन श्रेणी, म्हणजे ‘तज्ञ सेवा’(मनुष्यबळ संस्था, खासगी सुरक्षा संस्था आणि छोटे कंत्राटदार इ.) आणि ‘व्यापार-व्यावसायिक आस्थापने’ एकूण ग्राहक वाढीच्या 47.28% आहेत. शिवाय, 'इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर्स', 'ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग', 'इमारत आणि बांधकाम' उद्योग इत्यादी उद्योगांमध्ये निव्वळ वेतनपटाचा वाढता कल दिसून आला आहे.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818445)
Visitor Counter : 184