कंपनी व्यवहार मंत्रालय
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 1.67 लाख कंपन्या ही आजवरची सर्वाधिक कंपन्यांची नोंदणी केली
प्रविष्टि तिथि:
18 APR 2022 8:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने-एमसीएने, देशात 1.67 लाख कंपन्यांची नोंदणी केली. ही एका वर्षातली सर्वाधिक नोंदणी असून, त्याआधीच्या म्हणजेच 2020-21 या वर्षात, 1.55 लाख कंपन्यांची नोंदणी झाली होती.
2020-21 मध्ये जी नोंदणी झाली होती, ती आधीच्या वर्षांच्या तुलनेत, आजवरची सर्वाधिक नोंदणी होती. ही लक्षात घेतल्यास, 21-22 मध्ये नोंदली गेलेली वाढ विशेष लक्षणीय म्हणता येईल. वर्ष 2021-22 मध्ये, आधीच्या वर्षाच्या तुलनेत कंपन्यांच्या नोंदणीत झालेली वाढ, 8 टक्के अधिक आहे.
एमसीए ने 1.24 लाख कंपन्यांची नोंदणी वर्ष 2018-19 मध्ये केली होती आणि 1.22 लाख कंपन्यांची नोंदणी 2020-21 मध्ये केली होती.
केंद्र सरकारच्या उद्योगपूरक अभियानाचा भाग म्हणून, एमसीए ने अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे, अनेक प्रक्रिया कमी करण्यात आल्या आहेत. या सुधारणेमुळे, उद्योग सुरु करण्यासाठी लोकांचा वेळ आणि खर्च यातही बचत झाली आहे.
एमसीए ने फेब्रुवारी 2020 मध्ये SPICe+ फॉर्म सुरु केला, आणि 11 सेवा एकत्रित केल्या यात, 3 केंद्र सरकारच्या 3 विभागांच्या (कॉर्पोरेट, श्रम आणि महसूल विभाग) सेवा, 3 राज्य सरकारांच्या सेवा ( महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल) अन दिल्लीतील एनसीटी सेवांचा समावेश आहे.
वर्ष 2021-22 मध्ये ज्या राज्यांत, सर्वाधिक कॉर्पोरेट कंपन्यांची नोंदणी झाली, त्यात, महाराष्ट्र (31,107 कंपन्या), उत्तरप्रदेश (16,969 कंपन्या), दिल्ली (16,323 कंपन्या), कर्नाटक( 13,403 कंपन्या) आणि तामिळनाडू (11,020 कंपन्या) या कंपन्या आहेत.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1817890)
आगंतुक पटल : 332