कृषी मंत्रालय

उद्योगपूरक वातावरणाला प्रोत्साहन देत, केंद्रीय कृषी मंत्रालयाने, कृषीमालची आयात/निर्यात तसेच कीटकनाशके नोंदणीसाठी एकात्मिक आणि अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल केले सुरु

Posted On: 18 APR 2022 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज दोन पोर्टलचं प्रकाशन केलं. त्यापैकी एक, कीटकनाशकांच्या संगणकीकृत नोंदणीसाठी (CROP) आणि दुसरे पोर्टल, वनस्पती विलगीकरण माहिती व्यवस्था, (PQIS) विषयी आहे. कृषिक्षेत्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी लक्षात घेऊन, ही दोन पोर्टल्स सुरु करण्यात आली आहेत. या पोर्टलमुळे डिजिटल कृषी क्षेत्राला आणि पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, असं यावेळी बोलतांना, तोमर यांनी सांगितलं. कृषि उत्पादनांच्या निर्यातीने मोठी झेप घेतल्याबद्दल तोमर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच तंत्रज्ञानावर भर दिला असून तंत्रज्ञान वापरामुळे, कृषिक्षेत्राचा विकास झपाट्याने होईल, असा विश्वास, केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटलं आहे. या नव्या पोर्टलचा लाभ, शेतकरी, निर्यातदार आणि उद्योगक्षेत्राला मिळणार आहे.

PQMS पोर्टलमुळे, आवेदकांसाठी कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना, एक पारदर्शक पद्धती उपलब्ध होईल, तसेच ऑनलाईन, ई-पेमेंट, कागदपत्रे अपलोड, ऑनलाईन प्रमाणपत्र, नामांकन, प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे नूतनीकरण/ सुविधा आणि प्रमाणपत्र डाऊन लोड करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. तसेच, पुनर्विकसित सीआरओपी पोर्टलमुळे, उद्योगपूरक वातावरण निर्मितीला मदत होईल आणि त्यातून व्यापक पीक संरक्षणविषयक उपाययोजना, योग्य वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.

ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी,आणि त्याच्या भारतातील वापराला प्रोत्साहन देत, अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे, किसान ड्रोनचा वापर करण्याची सुविधा देण्यासाठी, कृषिविभाग सर्व हितसंबंधियांशी चर्चा करत आहे. या चर्चेनंतर, विभागाने, किटकनाशके आणि पोषकद्रव्य फवारणीसाठी, ड्रोनच्या अचूक, प्रभावी आणि सुरक्षित वापरासाठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धती तयार केली आहे. ड्रोन तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या दृष्टीने, मंत्रालयाने आज नोंदणीकृत असलेल्या जवळपास सर्वच, कीटकनाशकांची ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी, अंतरिम मंजूरी दिली आहे.

 

  

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817837) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil