उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञानातून दिव्यांगांना वगळता येणार नाही ',दिव्यांगस्नेही  तंत्रज्ञान बनवण्यासाठी प्रयत्नांची गरज - उपराष्ट्रपती


दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जागा  प्रवेशयोग्य बनवण्याच्या  महत्त्वावर नायडू यांनी  दिला भर

नायडू यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग  व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेला (एनआयईपीआयडी) दिली भेट

Posted On: 17 APR 2022 9:00PM by PIB Mumbai

 

दिव्यांगजन समुदाय किंवा दिव्यांग लोकांप्रती लोकांची मानसिकता बदलण्याचे आवाहन करत त्यांच्याविरुद्ध होणारा  कोणत्याही प्रकारचा भेदभाव रोखणे ही सरकार आणि समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. त्यांच्या  भरभराटीसाठी आणि ते कायम  पुढे राहावेत या दृष्टीने वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली."त्यांना आपल्या सहानुभूतीची गरज नाही, ते त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्याच्या संधीसाठी योग्य रित्या पात्र आहेत", असे ते म्हणाले.

नायडू यांनी आज  हैदराबाद येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग  व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेला (एनआयईपीआयडी) भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.एनआयईपीआयडी  या संस्थेच्या   बौद्धिक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्षम बनवण्याच्या कामाबद्दल  नायडू यांनी  कौतुक केले.

दिव्यांगांसाठी प्रवेश सुलभता हे हस्तक्षेपाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे हे अधोरेखित करून,अॅक्सेसिबल इंडियामोहिमेचा झालेला सकारात्मक परिणाम नमूद करत   पर्यावरण, वाहतूक, माहिती आणि संप्रेषण  प्रणाली या क्षेत्रात अधिक हस्तक्षेप वाढवण्याचे आवाहन केले.

सार्वजनिक जागा, वाहतूक आणि खाजगी इमारती अधिक दिव्यांगस्नेही  करण्याच्या गरजेवर जोर देत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना   दिव्यांग मुलांच्या गरजांबद्दल संवेदनशील करणे देखील महत्त्वाचे आहे, असे नायडू यांनी सांगितले.

"तंत्रज्ञानाने दिव्यांग लोकांना वगळलेले  नाही हे सुनिश्चित  करणे" महत्त्वाचे आहे असे सूचित करत त्यांनी भारतातील राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना दिव्यांगस्नेही  अत्याधुनिक  तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांच्या कामाला गती देण्याचे आवाहन केले.

लहानपणापासून दिव्यांग व्यक्तींमधील  कौशल्ये ओळखून आणि त्यांना सन्मानाच्या भावनेने  आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याचे आवाहन नायडू यांनी केले.'सर्वजन सुखिनो  भवन्तु ' आणि 'वसुधैव कुटुंबकम्' ही भारताची मूळ मूल्ये आहेत, याची आठवण करून देत, त्यांनी दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी सरकार, खाजगी क्षेत्र, नागरी समाज आणि कुटुंबांसह प्रत्येकाने  पुढाकार घेण्याचे आणि त्यांचे कर्तव्य ' धर्म 'पार पाडण्याचे आवाहन केले.

अपंगत्व येण्याचा  धोका असलेली मुले ओळखून आणि अपंगत्वाचे  लवकरात लवकर निदान करण्याच्या  महत्त्वावर उपराष्ट्रपतींनी  भर दिला आणि सर्व राज्यांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या क्रॉस-डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सर्व्हिस सेंटर (सीडीईआयएससी ) सारखी आणखी केंद्रे  सुरु करण्याचे आवाहन केले. मुलांमधील अपंगत्वाचा धोका लवकर ओळखण्यासाठी सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी सारख्या संस्थांशी भागीदारी करण्याचे त्यांनी एनआयईपीआयडीला सुचवले. मुलांमधील अपंगत्वाचा धोका लवकर लक्षात आल्यास पालकांचे समुपदेशन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अनुवांशिक विकार लवकर शोधण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी एनआयईपीआयडी आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी ) सारख्या संस्थांमध्ये अधिक सहकार्याची सूचना त्यांनी केली.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817617) Visitor Counter : 195