उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 APR 2022 6:08PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी दिलेला संदेश खालीलप्रमाणे आहे:
प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनर्वताराचे प्रतीक असलेल्या ईस्टरच्या शुभ प्रसंगी मी देशवासियांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
ईस्टरचा पवित्र सण लोकांना आठवण करून देतो की प्रेम हे द्वेषापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे आणि सदाचार नेहमीच वाईटावर विजय मिळवतो.
सर्व मानवांप्रति करुणा भाव ठेवून ईस्टर साजरा करूया. हा दिवस आपल्या जीवनात शांतता आणि सौहार्द घेऊन येवो.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817330)
Visitor Counter : 176