वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पायाभूत सुविधांसाठी सर्वांगीण आणि एकात्मिक नियोजनाकरिता पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजने अंतर्गत झालेल्या प्रगतीचा पियुष गोयल यांनी घेतला आढावा
Posted On:
14 APR 2022 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी पीएम गतिशक्ती बाबत आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के त्रिपाठी, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव रंजन, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अनुराग जैन आणि आणि इतर सर्व पायाभूत सुविधा मंत्रालये/विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
राष्ट्रीय बृहत योजना ही पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतलेल्या विविध हितधारकांना दृश्यमानता प्रदान करून ‘आत्मनिर्भर भारत’ चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल. यामध्ये विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या पायाभूत सुविधा योजनांचा समावेश केला जाईल. वस्त्रोद्योग क्लस्टर्स, औषध निर्मिती क्लस्टर्स, संरक्षण कॉरिडॉर, इलेक्ट्रॉनिक पार्क्स, औद्योगिक कॉरिडॉर, मासेमारी क्लस्टर्स, कृषी विषयक झोन इत्यादी आर्थिक झोनचाही मास्टर प्लॅन अंतर्गत समावेश केला जाईल.
यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि देशाची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल.
या बैठकीत संस्थात्मक चौकट कृतीत आणण्यात आल्याची नोंद घेण्यात आली. त्यानुसार, उदयोन्मुख आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी बृहत योजनेतील कोणतेही बदल मंजूर करण्याकरिता कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांचा एक अधिकार प्राप्त गट (EGoS) स्थापन करण्यात आला आहे.
25 राज्यांमध्ये सचिवांचा अधिकार प्राप्त गट स्थापन करण्यात आला आहे, नेटवर्क नियोजन गट 9 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि 6 राज्यांमध्ये तांत्रिक सहाय्य विभागांची स्थापना करण्यात आली आहे.
व्यत्यय, खर्च आणि प्रकल्प अंमलबजावणीतील वाढीव वेळ मर्यादित करण्याकरिता पूर्व-पश्चिम, पूर्व-किनारा आणि उत्तर -दक्षिण समर्पित मालवाहू कॉरिडॉर (DFCs) मार्ग निश्चितीसाठी रेल्वे मंत्रालयाच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने पोर्टलचा वापर केला आहे.
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेची क्षमता अधोरेखित करताना मंत्री महोदयांनी यावर भर दिला की विविध आर्थिक क्षेत्रांशी सुधारित बहुआयामी संपर्क व्यवस्था माल आणि लोकांची अखंडित वाहतूक सुनिश्चित करेल. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजना पोर्टल पायाभूत सुविधांबद्दल एक विहंगम दृश्य प्रदान करेल आणि चांगले नेटवर्क नियोजन आणि जलद मंजुरीची सुविधा देईल.
समारोप प्रसंगी, त्यांनी केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि राज्यांनी राष्ट्रीय बृहत योजनेचा व्यापक स्वीकार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी पीएम गतिशक्तीच्या सकारात्मक प्रभावाची प्रशंसा केली आणि पीएम गतिशक्तीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा मंत्रालयांनी एकात्मिक पद्धतीने केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816774)
Visitor Counter : 218