ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने 2021-22 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य सरकारांना खाद्यान्न अनुदानासाठी 2,94,718/- कोटी रुपये जारी केले


हे अनुदान 2020-21 मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न अनुदानाच्या सुमारे 140% आणि 2019-20 मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न अनुदानाच्या सुमारे 267% आहे

इथेनॉल मिश्रणात 62% ने वाढ, 2019-20 मधील 5% वरून 2020-21 मध्ये 8.1% वर

Posted On: 13 APR 2022 8:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (NFSA) अंतर्गत किमान हमी भावानुसार खरेदी तसेच अन्नधान्याच्या वेगवान  वितरणासाठी, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य सरकारांना खाद्यान्न अनुदानासाठी डीसीपी (विकेंद्रित प्रापण व्यवस्था ) आणि बिगर डीसीपी नुसार 2,92,419.11 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत  2,94,718/- कोटी रुपये जारी केले.   हे अनुदान  2020-21 मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न  अनुदानाच्या सुमारे 140% आणि 2019-20 मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न अनुदानाच्या सुमारे 267%  आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे :-

(Rs. Crores)

Year

Budget Estimates

Revised Estimates

Actual Expenditure

% Expdr w.r.t. RE

2019-20

1,88,102.21

1,10,187.13

1,10,187.13

100.00

2020-21

1,19,302.22

4,30,414.77

5,47,609.31

127.23

2021-22

2,46,616.00

2,92,419.11

2,94,718.54

100.79

आपल्या योजनांचा लाभ समाजातील विविध असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग नेहमीच तत्पर असतो. या अनुषंगाने 2021-22 या आर्थिक वर्षात, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने अनुसूचित जातींसाठी  सुमारे  24,000/- कोटी रुपये , अनुसूचित जमातींसाठी  12,000/- कोटी रुपये आणि ईशान्य प्रदेशसाठी  400/- कोटींहून अधिक निधी जारी केला.

रब्बी विपणन हंगाम 2021-22 मध्ये गहू आणि खरीप विपणन  हंगाम 2021-22 मधील धान खरेदीसह एकूण 1175 लाख मेट्रिक टन अन्नधान्य 2.31 लाख कोटी रुपयांच्या किमान हमी भावासह खरेदी करण्यात आले असून  154लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.

Phases

 

Period

Allocation

(in LMT)

Financial Implication

 (Rs. Crore)

I

April – June, 2020

321.00

Rs.1,13,000.00 Crore

II

July – Nov, 2020

III

May – June, 2021

79.46

Rs. 26,602.00 Crore

IV

July – Nov, 2021

198.78

Rs. 67,266.00 Crore

V

Dec’21 – March’22

159.05

Rs. 53,344.52 Crore

VI

April – Sept 2022

244.00

Rs.80,850.67 Crore

 

GRAND TOTAL

1,002.29

Rs.3,41,062.87 Crore

इथेनॉलचे उत्पादन  2019-20 मधील 173 कोटी लिटरवरून 2020-21 (ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021) मध्ये  302 कोटी लिटरपर्यंत वाढले आहे.   इथेनॉल मिश्रण 62% ने वाढले असून 2019-20 मधील  5% वरून 2020-21 मध्ये 8.1% पर्यंत गेले आहे.  30.09.2021 रोजी देशातील इथेनॉलची उत्पादन क्षमता 825 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे जी  2021-22 मध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी  पुरेशी आहे. 31.3.2022 पर्यंत ही उत्पादन क्षमता 849  कोटी लिटर इतकी वाढली  आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात, विभागाच्या इथेनॉल व्याज माफी  योजनेअंतर्गत, नोडल बँक नाबार्डला  160 कोटी रुपये जारी करण्यात आले. 2021-22 पर्यंत या योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेली एकत्रित रक्कम  360 कोटी रुपये आहे.

 

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816566) Visitor Counter : 188