उपराष्ट्रपती कार्यालय

कुष्ठरोगाचे लवकर निदान होण्यासाठीच्या प्रयत्नांची व्याप्ती आणि वेग वाढवण्याचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचे आवाहन


उपराष्ट्रपतींच्या हस्ते कुष्ठरोगविषयक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, 2021 प्रदान

Posted On: 13 APR 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

कुष्ठरोगाचे लवकर निदान व्हावे, त्यासाठीचे योग्य उपचार सर्वांना उपलब्ध असावेत आणि कुष्ठरोग विषयक सर्व सेवा एकात्मिक स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, यासाठीच्या प्रयत्नांची गती आणि व्याप्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले  आहे.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज कुष्ठरोग निवारणासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार-2021  देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. चंडीगढचे डॉ भूषण कुमार, आणि गुजरात येथील सहयोग कुष्ठ यज्ञ विश्वस्त संस्था यांना हा पुरस्कार उपराष्ट्रपती भवनात झालेल्या एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला. गांधी स्मृति कुष्ठरोग फाऊंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यात, लोक आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. या लोककल्याणकरी कार्याला, अधिकाधिक पाठिंबा मिळण्यासाठी, सामाजिक एकीकरण महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. ग्रामसभांनी देखील, त्यांच्या कार्यक्रमात कुष्ठरोग निवारण अभियान समाविष्ट करावे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

कुष्ठरोगाविरुद्ध भारताचा सातत्यपूर्ण लढा एका स्थिर वेगाने सुरु आहे, यांची दखल घेत आज भारताने, या लढ्यात, देशातल्या 10 हजार माणसांमागे एक कुष्ठरोगी इतपर्यंत, या आजाराचे प्रमाण रोखण्यात यश मिळवले, आहे असे त्यांनी सांगितले.

मात्र, आजही , जगातील सर्वाधिक कुष्ठरुग्ण भारतात आढळत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले की जगात आढळणाऱ्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी 51 टक्के रुग्ण (2020-21 ची आकडेवारी)भारतात आढळतात . कुष्ठरोगाविरुद्धच्या लढाईत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आघाडीवर असून, कुष्ठरोग निर्मूलनासाठी महत्वाचे कार्य करत आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

महात्मा गांधी यांनी कुष्ठरोगाशी निगडीत सामाजिक कलंकाची भावना दूर करण्यासाठी, दिलेल्या योगदानाचे स्मरण करत, उपराष्ट्रपती म्हणाले, की कुष्ठरोग्यांप्रती महात्मा गांधी यांच्या मनात असलेली करुणेची भावना, सर्व मानवतेविषयीच्या दयाभावनेचे एक अत्युच्च उदाहरण आहे. ज्या काळात, या आजाराविषयी अनेक गैरसमज आणि अज्ञान होते, त्या काळात अनेकदा गांधीजींनी स्वतः कुष्ठरोग्यांवर उपचार करत  एक आदर्श निर्माण केला होता असे नायडू म्हणाले.

 

  S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1816560) Visitor Counter : 442


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil