पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जिज्ञासा प्रश्नमंजुषा स्पर्धाचा प्रारंभ


जागतिक स्तरावर जवळपास 2 कोटी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता

Posted On: 12 APR 2022 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिज्ञासा, ज्ञानाचा शोध या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री  हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे करण्यात आला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, सभ्यता, साहित्य, वास्तुकला आणि प्राचीन भारतातील वारसा लाभलेल्या ज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे  हा जिज्ञासा या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा मानस आहे असे पुरी म्हणाले.  ही प्रश्नमंजुषा स्पर्धा  जगभरातील लोकांसाठी खुली आहे. यात जवळपास 2 कोटी लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.  स्पर्धेतील सहभागींच्या कलागुणांना वाव देण्याची ही उत्तम संधी आहे.  ते पुढे म्हणाले की ही स्पर्धा केवळ भारतीय असण्याचे प्रतिबिंब नाही तर यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामुळे आत्मनिर्भरतेलाही चालना मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य ध्येयदृष्टी पुढे नेणारे, जिज्ञासा हे तंत्रज्ञान, नाविन्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे जागरूकता निर्माण करण्याच्या आणि ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.  जिज्ञासाची मुख्य प्रेरणा पंतप्रधानांच्या अंत्योदयाशी असलेल्या वचनबद्धतेतून प्राप्त झाली आहे. जिज्ञासा ही खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे.  राजकोट, भोपाळ, शिलाँग आणि नवी दिल्लीसह अनेक ठिकाणच्या शाळांनी या प्रक्षेपणात भाग घेतला.  1,000 हून अधिक सहभागी आभासी माध्यमातून सामील झाले.

जिज्ञासाचे आयोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंगद्वारे समर्थित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.  जगाच्या कोणत्याही भागातून कोणीही जिज्ञासा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रश्नमंजुषेत सहभागी होऊ शकतो.  दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. 13-18 वयोगटातील आणि औपचारिक शिक्षण प्रणालीचा भाग नाहीत ते देखील जिज्ञासामध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.  ही स्पर्धा 17 भाषांमध्ये होणार आहे.  जिज्ञासाने भारतातील 742 जिल्ह्यांमध्ये अर्थात भारताच्या विचार आणि आदर्शांवर संवाद सुरू करण्याचे आश्वस्त केले आहे.

जिज्ञासा विजेते प्रत्येकी 10 लाख रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. www.akamquiz.com या संकेतस्थळावर जिज्ञासा सर्वांसाठी उपलब्ध असेल. जिज्ञासा गुगल प्ले स्टोअरवर जिग्यासा क्विझ म्हणून समर्पित ऍप्लिकेशनवर देखील उपलब्ध असेल;  ioS ऍप्लिकेशन वेबसाइटवरूनच डाउनलोड केले जाऊ शकते.

 

 

 

 

 

  S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816104)