इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वाहतूक स्थितीवर तोडगा काढण्यासाठी इंडेजिनिअस इंटेलिजेन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित

Posted On: 11 APR 2022 12:36PM by PIB Mumbai

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने भारतीय शहरांमध्ये दुस-या टप्प्यात राबविण्यासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशनकार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या स्वदेशी पर्यायामुळे वाहनचालकाला ऑनबोर्ड’  मदत तसेच चेतावणी प्रणालीची सुविधा मिळणार आहे. ओडीएडब्ल्यूएस, बस सिग्नल प्राधान्य प्रणाली आणि कॉमन स्मार्ट आयओटी कनेक्टीव्ह सॉफ्टवेअरचा या कार्यप्रणालीमध्ये समावेश आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) आणि आयआयटी -मद्रास यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यप्रणाली  विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगाने औद्योगिक सहयोगी म्हणून कार्य केले आहे.

1. चालकाला ऑनबोर्ड मदत आणि चेतावणी प्रणाली - ODAWS:  सुधारित महामार्गाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे सुरक्षिततेची चिंता जास्त आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार सुमारे अपघातांच्या 84 टक्के प्रकरणांमध्ये वाहनचालकाची चूक’’ हे अपघातामागचे कारण असते. चालकाच्या त्रुटी कमी करण्यासाठी वाहन चालकांना मदत व्हावी आणि त्यांना धोक्याविषयी चेतावणी दिली जावी, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे आता गरजेचे ठरले आहे.

वाहन चालकांच्या मदतीसाठी ध्वनी आणि दृश्य यांच्याविषयी चेतावणी देताना चालक कशा प्रकारे गाडी चालवत आहे, त्याच्या सभोवताली काय आहे, याचे निरीक्षण करणारी ओडीएडब्ल्यूएस वाहन -प्रणित सेन्सर सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये नॅव्हिगेशनल युनिट, चालक सहायक कन्सोल आणि एमएमव्हेव रडार सेन्सर यासारखे सब-मॉड्यूल्स विकसित करण्यात आले आहेत. एमएमव्हेव रडार सेन्सर वापरून आजूबाजूच्या वाहनांची स्थिती, त्यांचा वेग यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. तसेच नॅव्हिगेशनल सेन्सरमुळे वाहनाचे अचूक भौगोलिक स्थान, चालक गाडी कसे चालवत आहे म्हणजेच त्याची गाडी चालविण्याची पद्धत कशी आहे, याची माहिती मिळू शकणार आहे. ओडीएडब्ल्यूएस अल्गोरिदमचा वापर सेन्सर डेटाचा अर्थ लावण्यासाठी आणि चालकाला तात्काळ सूचना देण्यासाठी, रस्त्यावर सुरक्षा वाढविण्यासाठी करता येणार आहे.

2.        बस सिग्नल प्राधान्य प्रणाली:- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी आपल्याकडे पुरेशी विश्वासार्हता नाही. त्यामुळे लोक व्यक्तिगत, खाजगी वाहनांनी प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. जास्तीत जास्त नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांकडे वळवायचे असेल, तर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक शाश्वत, सुरक्षित केली तर वाढत्या रहदारीच्या समस्येवर तोडगा मिळू शकणार आहे. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या गाड्या अतिशय विलंबाने धावतात, यामागे प्रमुख कारण म्हणजे शहरांमधल्या रस्त्यांच्या चौका-चौकांमध्ये असलेली सिग्नल यंत्रणा हे आहे.

बस सिग्नल प्राधान्य प्रणाली, ही एक अशी प्रणाली आहे, जी सिग्नल-नियंत्रित चौकात, सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बसगाड्यांना चांगल्या प्रकारे सामावून घेण्यासाठी सामान्य वाहतूक सिग्नलच्या परीचालन यंत्रणेत स्वतःच बदल करते.  आणीबाणीच्या वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या सरसकट प्राधान्याऐवजी सर्व वाहनांच्या विलंबामध्ये एकंदरीत कपात करत, यात सशर्त प्राधान्यक्रम दिला जाईल. ही विकसित प्रणाली, ग्रीन एक्स्टेंशनद्वारे किंवा लाल ट्रंकेशनद्वारे चौकापर्यंत जाणारी ,सिग्नल पार करणारी सर्व वाहने विचारात घेऊन सार्वजनिक वाहतूक बसेसना प्राधान्य देऊन वाहनधारकाकडून होणारा विलंब कमी करण्यास सक्षम आहे.

3. कॉमन स्मार्ट आयओटी कनेक्टिव (CoSMiC): हे वनएमटूएम (OneM2M) आधारित जागतिक मानकांचे पालन करणारे, एक मध्यम स्वरूपाचे सॉफ्टवेअर आहे, जे आयओटी (IoT) ची मानकांवर आधारित यंत्रणा प्रदान करते. हे वापरकर्त्यांना आणि विविध कार्यांसाठी त्याचा उपयोग करणाऱ्या सेवा प्रदात्यांना खुले अ‍ॅप्लिकेशन स्टँडर्ड्स वापरण्यासाठी वनएमटूएम (OneM2M) मानकांचे पालन करणार्‍या चांगल्या-परिभाषित सामान्य सेवा कार्यक्षमतेसह खुला इंटरफेस वापरण्याची सुविधा देते. हे लक्षात घेऊन, कॉस्मिक(CoSMiC) कॉमन सर्व्हिस लेयरचा वापर कोणत्याही वापरकर्त्याच्या विशिष्ट मानकांशी आदानप्रदान करण्यासाठी आणि स्मार्ट सिटी डॅशबोर्डसह इंटरऑपरेबिलिटी वाढवण्यासाठी उपयोगात  आणता येतो.  आडव्या पध्दतीचे सायलो आर्किटेक्चर विविध आयओटी(IOT) डिव्हाइसेस आणि त्यांच्या वापरादरम्यान दरम्यान एकत्रित परीचालन आणि माहितीचे आदानप्रदान सुनिश्चित करते आणि वापरकर्त्यांचे साधन वापरताना  आपोआप बंद होणे टाळते.  कॉस्मिक (CoSMiC) ज्या 12 सामान्य सेवा कार्यांचे पालन करते, त्यात नोंदणी, परीशोधन, सुरक्षा, गट व्यवस्थापन, माहिती व्यवस्थापन आणि साठवणूक, सदस्यत्व आणि सूचना, साधन व्यवस्थापन, अनुप्रयोग आणि सेवा व्यवस्थापन, संपर्क व्यवस्थापन आणि वितरण हाताळणी, नेटवर्क सेवा एक्सपोजर, स्थान, सेवा विद्युतभरण  आणि लेखा,यांचा समावेश आहे

कॉस्मिक (CoSMiC) प्लॅटफॉर्म नॉन-वनएमटूएम (NoDN) उपकरणे किंवा वेगवेगळ्या अनुप्रयोगांना कॉस्मिक प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी आंतरजोडणी व्यवस्था (इंटरवर्किंग प्रॉक्सी एंटिटी IPE) प्रदान करते.  भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) नकाशामध्ये आयओटी युनिट्स, उत्पादने, अनुप्रयोग आणि त्याची माहिती  थेट दर्शवणारे डॅशबोर्ड पृष्ठ प्रदान करते.  ऐतिहासिक तक्ते आणि अहवालांसाठी दुय्यम स्वरुपाचे माहिती भांडार देखील उपलब्ध आहे. कॉस्मिक यंत्रणा (CoSMiC) आयओटी उपकरणे आणि अनुप्रयोगांच्या अखंड जोडणीसाठी पूर्णतः सुलभ आहेत.

***

S.Thakur/S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815627) Visitor Counter : 385