राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते  माधवपूर घेड मेळ्याचे उद्घाटन

Posted On: 10 APR 2022 10:18PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (10 एप्रिल, 2022) गुजरातमधील माधवपूर घेड, पोरबंदर येथे पाच दिवसीय माधवपूर  घेड मेळ्याचे उद्घाटन केले. 2018 पासून, गुजरात सरकारच्या  सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भगवान कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पवित्र मिलनाचा सोहळा  साजरा करण्यासाठी दरवर्षी या मेळ्याचे आयोजन केले  जाते.

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी रामनवमीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत गावात आणि बापूंचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरजवळ आयोजित माधवपूर घेड  मेळ्याचे उद्घाटन करणे हा त्यांचा बहुमान आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. भारताची सांस्कृतिक एकता किती प्राचीन आहे आणि आपल्या सामाजिक समरसतेची मुळे किती खोलवर आहेत,हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची लोककथा दर्शवते, आजच्या उत्तर प्रदेशात जन्मलेले  श्री कृष्ण गुजरातला आपले कार्यस्थळ  बनवतात आणि आपल्या देशाच्या आजच्या ईशान्य भागातील राजकन्या रुक्मिणीशी लग्न करतात. लोकमान्यतेनुसार ,माधवपूर घेड गावची जमीन त्यांच्या मिलनाची साक्षीदार आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

आपल्या विशाल देशाला प्राचीन काळापासून मेळे  ,उत्सव आणि तीर्थक्षेत्रे यांनी  सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेच्या धाग्याने बांधून ठेवले आहे.

माधवपूर मेळा  गुजरातशी  ईशान्य  प्रदेशाला  एका अविभाज्य बंधनाने जोडतो. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना, विशेषत: तरुण पिढीला आपला वारसा, संस्कृती, कला, हस्तकला आणि पारंपारिक पाककृती याविषयी ज्ञान मिळवण्याची संधी मिळते. या कार्यक्रमांमुळे  पर्यटनालाही चालना मिळते, असे राष्टपती म्हणाले.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815496) Visitor Counter : 210


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi