आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त वैज्ञानिक संमेलनाचे  उद्घाटन केले

Posted On: 09 APR 2022 6:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आयुष, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली येथे होमिओपॅथी: पीपल्स चॉईस फॉर वेलनेसवरील  दोन दिवसीय वैज्ञानिक संमेलनाचे  उद्घाटन केले. आयुष आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री डॉ महेंद्रभाई मुंजपारा हे देखील यावेळी उपस्थित होते. जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत तीन सर्वोच्च संस्था -सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन  होमिओपॅथी , नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी यांनी संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केले आहे.

उपस्थितांना संबोधित करताना सोनोवाल यांनी आयुषच्या शिक्षण, व्यवसाय  आणि औषध विकास क्षेत्रात परिवर्तनीय  बदल होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसिन आणि अलिकडेच स्थापन झालेल्या नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी यांनी आयुष शिक्षणाला नवीन शैक्षणिक धोरणानुसार संरेखित केले आहे आणि नवीन प्रतिभावंताना  इतके आकर्षित करत आहे कीआयुष ही   त्यांची पहिली उपचार पसंती तर आहेच शिवाय  वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील पहिली पसंती बनू शकते. ते म्हणाले की होमिओपॅथी औषधे सहजपणे दिली जातात आणि मोठ्या संख्येने लोक ती स्वीकारतात.

या प्रसंगी डॉ. महेंद्रभाई मुंजपरा यांनी  विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आणि कमी खर्चात सुरक्षित मार्गाने वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठी होमिओपॅथी अत्यंत प्रभावी असल्याचे अधोरेखित केले.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815245) Visitor Counter : 194